विरोधकांनी UPA नाव बदललं, कारण...; श्रीकांत शिंदेंनी स्किम VS स्कॅमची लढाई म्हणत संसदेत सादर केली "ABCD"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 03:37 PM2023-08-08T15:37:55+5:302023-08-08T15:38:55+5:30

"यांना वाटते, INDIA नाव केल्याने भारतातील जनता यांच्यासोबत होईल. मात्र, यांनी यूपीए नाव बलले, कारण यांना यूपीए नावाची लाज वाटते."

The opposition changed the name to UPA because Shrikant Shinde read out ABCD in Parliament saying scheme vs scam | विरोधकांनी UPA नाव बदललं, कारण...; श्रीकांत शिंदेंनी स्किम VS स्कॅमची लढाई म्हणत संसदेत सादर केली "ABCD"

विरोधकांनी UPA नाव बदललं, कारण...; श्रीकांत शिंदेंनी स्किम VS स्कॅमची लढाई म्हणत संसदेत सादर केली "ABCD"

googlenewsNext

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला आहे. या प्रस्तावावर आजपासून लोकसभेत चर्चेला सुरुवात झाली. या चर्चेत सहभाग घेत, शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. "यांना वाटते, INDIA नाव केल्याने भारतातील जनता यांच्यासोबत होईल. मात्र, यांनी यूपीए नाव बलले, कारण यांना यूपीए नावाची लाज वाटते. कारण यूपीएचे नाव ऐकताच लोकांना घोटाळे, भष्टाचार आठवतात," असे म्हणत शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधा आहे.

शिंदे म्हणाले, "येथे आज चर्चा अविश्वासाची नाही, तर अविश्वासविरोधात जनविश्वासाची आहे. कारण जनविश्वास पंतप्रधान मोदींसोबत आहे. आपल्या विरोधात जनतेनेच 2014 आणि २०२४ मध्ये अविश्वास प्रस्ताव पारित केला आहे. यांनी आपले  नाव इंडिया अलायन्स केले आहे. यांना वाटते, असे केल्याने भारतातील जनता यांच्यासोबत होईल. मात्र, यांनी यूपीए नाव बलले, कारण यांना यूपीए नावाची लाज वाटते. कारण यूपीएचे नाव ऐकताच लोकांना घोटाळे, भष्टाचार आठवतात. मग यात टू जी घोटाळा असो, अगस्ता क्सॅम असो, दहशतवादी हल्ले असो वा रिमोट कंट्रोल वाले सरकार असो. यामुळेच लोकांनी काँग्रेसचा हात सोडून पंतप्रधान मोदीजींकडे देशाची धुरा सोपवली आहे." 

शिंदे म्हणाले, 'हे  म्हणतात, "नफरत की बाजार, में मोहोब्बतकी दुकान खोल रहा हूं". मला वाटते, एका व्यक्तीच्याविरोधात हे सर्व लोक एकत्रित येत आहेत. ज्यांना कुणी नेता नाही, ज्यांची नियत नाही आणि ज्यांची कसल्याही प्रकारची निती नाही. अशी आघाडी येथे ऊभी झाली आहे. २००४ ते २०१४ पर्यंत यूपीएने देशावर राज्य केलं. मात्र देशाला काय मिळाले? केवळ घोटाळे आणि भष्टाचार. दहशतवादी हल्ले एवढे झाली की, देशातील एकही मोठे शहर या दहशतवादी हल्ल्यापासून सुटले नाही.'

"आडला हरी आणि गाढवाचे पाय धरी" -
'INDIA नाव देऊन आपण लोकांची दिशाभूल करू शकतो, असे यांना वाटते. आज यांच्या आघाडीत पीएम इन वेटिंग आहे. कारण या टीमकडे कुणी कर्णधार नाही आणि यांना सामना लढवायचा आहे अन् विश्वचषक जिंकायचा आहे. आमच्या महाराष्ट्रात एक म्हण प्रसिद्ध आहे, "आडला हरी आणि गाढवाचे पाय धरी". मजबुरी लोकांना काय काय करायला भाग पाडते?' असेही शिंदे यावेळी म्हणाले.

स्किम VS स्कॅमची लढाई -
येथे केवळ NDA vs INDIA चा सामना नाही, तर स्किम VS स्कॅमची लढाई आहे, असे म्हणत श्रिकांत शिंदे यांनी यावेळी युपीए काळात झालेले भष्टाचार आणि NDA काळातील केली गेलेली विकास कामे अल्फाबेटिकली सांगित ABCD च वाचून दाखवली.

Web Title: The opposition changed the name to UPA because Shrikant Shinde read out ABCD in Parliament saying scheme vs scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.