उप-संचालकांचा मृत्यूपूर्वी काढलेला फोटो आला समोर, अजुनही सापडला नाही मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 07:12 PM2024-09-04T19:12:06+5:302024-09-04T19:15:44+5:30
aditya vardhan singh ias : गंगा स्नान करण्यासाठी गेलेल्या आरोग्य उप-संचालक आदित्यवर्धन सिंह पाण्यात बुडाले. दहा हजार रुपये रोख असते, तर कदाचित ते वाचले असते.
Ias officer drowns ganga river : पाच दिवसांपूर्वी गंगा स्नानासाठी आलेल्या आयएएस अधिकारी आदित्यवर्धन सिंह यांचा अजुनही मृतदेह सापडलेला नाही. उत्तर प्रदेशमध्ये आरोग्य उप-संचालक म्हणून कार्यरत असलेले आदित्यवर्धन मित्रासोबत गंगा स्नानासाठी आले आणि तिथेच मृत्युने त्यांच्यावर झडप घातली. गंगेत मृत्युने डाव साधण्यासाठी काढलेला त्यांचा फोटो आता समोर आला आहे. (aditya vardhan singh ias Latest Update)
कानपूरमधील नानामऊ घाटावर आदित्यवर्धन सिंह स्नानासाठी आले होते. पाच दिवसांपूर्वी ते बुडाले. त्यांचा शोध घेतला जात असून, पाच दिवसानंतरही शोध मोहीम सुरूच आहे. शोध घेण्यासाठी बोलवलेली एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके परतली असून, पीएससी मोटर बोट गंगा नदीत त्यांचा शोध घेत आहे.
आदित्यवर्धन सिंह कसे बुडाले?
योगेश मिश्रा आणि प्रदीप तिवारी या मित्रांसोबत आदित्य वर्धन सिंह गंगा स्नानासाठी आले होते. नानामऊ घाटावर ते नदीत उतरले. आदित्य वर्धन सिंह आणि योगेश मिश्रा यांचा फोटो काढण्यासाठी प्रदीप तिवारी काठावरच थांबले. प्रदीप तिवारीने फोटो काढलेला फोटो आदित्य वर्धन सिंह यांचा शेवटचा फोटो ठरला.
फोटो काढल्यानंतर आदित्यवर्धन सिंह प्रदीपला म्हणाले की, गाडीत माझा फोन आहे. तो आण आणि चांगला फोटो काढ. प्रदीप मोबाईल आणण्यासाठी गेला आणि चांगला फोटो काढण्यासाठी आदित्य वर्धन सिंह खोल पाण्यात गेले. पण, पाण्याच्या खोलीचा अंदाज चुकला आणि ते बुडायला लागले.
१० हजार रोख नव्हते, मदत नाकारली
आदित्य वर्धन सिंह बुडायला लागल्यानंतर योगेशने काठावर असलेल्या गोताखोरांकडे मदत करण्याची विनंती केली. त्यांनी दहा हजार रुपये मागितले. पण, रोख १० हजार नसल्याने त्यांनी मदत करण्यास नकार दिला. ऑनलाईन पैसे पाठवेपर्यंत आदित्य वर्धन सिंह पाण्यात बुडाले आणि बेपत्ता झाले. त्यांचा मृतदेह पाच दिवस उलटले तरी सापडलेला नाही. दरम्यान, आता त्यांचा शेवटचा फोटो समोर आला आहे.