मुद्द्याची गोष्ट... कुणी तुमचा डेटा चोरला तर..?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 07:00 AM2024-02-04T07:00:10+5:302024-02-04T07:00:54+5:30

मुद्द्याची गोष्ट : नवे युग डेटा अर्थात माहितीचे आहे. आपला डेटा अनेक ठिकाणी गाेळा हाेताे. हा डेटा लीक झाल्यास तुमची वैयक्तिक आणि आर्थिक सुरक्षा धोक्यात येऊ शकते. एका क्षणात तुमचे बॅंक खाते रिकामे हाेईल किंवा तुमची ओळखही चोरी हाेऊ शकते. त्यामुळे डेटा सुरक्षिततेला फार महत्त्व आले आहे.

The point is... what if someone steals your data..? | मुद्द्याची गोष्ट... कुणी तुमचा डेटा चोरला तर..?

मुद्द्याची गोष्ट... कुणी तुमचा डेटा चोरला तर..?

डॉ. अपूर्वा जोशी
फॉरेन्सिक अकाऊंटंट,
स्वतंत्र संचालक
भारतात इंटरनेटचा प्रसार गेल्या दशकात प्रचंड प्रमाणात वाढलाय. डिजिटलायझेशनमुळे डेटा म्हणजे भविष्यातले ‘तेल’ म्हटले जाऊ लागले. डेटा मौल्यवान होऊ लागला. पण, त्यामुळे वेगळेच प्रश्न निर्माण होऊ लागले. त्यापैकी एक डेटाची सुरक्षितता. डेटा म्हणजे माहितीचा संग्रह. ही माहिती कोणत्याही स्वरूपात असू शकते. उदाहरणार्थ, मजकूर, चित्रे, व्हीडिओ, ऑडिओ इत्यादी. डेटाला मराठीत विदा असे पण म्हटले जाते. आपण दररोज अनेक प्रकारची माहिती गोळा करतो, विश्लेषण करतो आणि त्यावर आधारित निर्णय घेतो. डेटाचे विश्लेषण करून आपण नवीन उत्पादने आणि सेवा विकसित करू शकतो, समस्यांचे निराकरण करू शकतो. हा डेटा लीक झाला तर? डेटा लीक हे एक गंभीर आव्हान बनले आहे. 

डेटा प्रायव्हसी म्हणजे काय? 

डेटा प्रायव्हसी म्हणजे आपल्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण करणे. यामध्ये आपले नाव, पत्ता, जन्म तारीख, संपर्क, आर्थिक, वैद्यकीय इत्यादी माहितीचा समावेश होतो. या माहितीचा गैरवापर होऊन आपल्यासाठी कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून डेटा प्रायव्हसी महत्त्वाची ठरते.

डेटा किती प्रकारचा? 
काही सामान्य प्रकारांचा डेटा :  
वैयक्तिक डेटा : नाव, पत्ता, संपर्क माहिती, आर्थिक माहिती, वैद्यकीय इत्यादी माहिती. 
बिझनेस डेटा : विक्री डेटा, ग्राहक डेटा, उत्पादने आणि सेवांची माहिती.
विज्ञान आणि तंत्रज्ञान डेटा : संशोधन, प्रयोग, उपकरणे आणि प्रणालींबद्दलची माहिती.
सार्वजनिक डेटा : सरकारी माहिती, निवडणूक, सार्वजनिक, सामाजिक इत्यादी माहिती. 

डेटा लीक कसा हाेताे?

हॅकिंग
हॅकर्स तुमच्या डिव्हाइस किंवा नेटवर्कमध्ये प्रवेश करून तुमची माहिती चोरण्याचा प्रयत्न करतात.

मालवेयर
एक प्रकारचे सॉफ्टवेअर जे तुमच्या डिव्हाइसवर गुप्तपणे स्थापित होते आणि माहिती चोरी करते.

फिशिंग
हा प्रकार म्हणजे खोट्या ई-मेल किंवा वेबसाइटवर क्लिक करायला लावून फसवतो. 

मानवी चूक
मानवी चुकीमुळे तुमची गोपनीय माहिती चुकीच्या लोकांना मिळते. 

कसा सुरक्षित ठेवाल डेटा?
nपासवर्ड ऑनलाइन  वापरा.
nपासवर्डमध्ये अंक, अक्षरे आणि विशेष चिन्हे वापरा.  
nपासवर्ड नियमित बदला.
nटू फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरा.
nडिव्हाइसचे सुरक्षा सॉफ्टवेअर अपडेट ठेवा.
nआपल्या डिव्हाइसवर अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरा.
nसार्वजनिक नेटवर्कवर महत्त्वाची माहिती शेअर करणे टाळा.
nसोशल मीडियावर तुमच्या वैयक्तिक माहितीचे जास्त प्रदर्शन टाळा.

नुकसान किती?
‘अपग्रॅड’ या संस्थेने २०२१मध्ये एक अहवाल दिला हाेता. त्यानुसार, डेटा उल्लंघनामुळे किंवा हॅकिंगमुळे जागतिक स्तरावर होणारे वार्षिक नुकसान ४ लाख कोटी डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा 
अंदाज आहे. 

Web Title: The point is... what if someone steals your data..?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.