राष्ट्रपतींच्या हस्ते उद्या ‘राष्ट्रीय बाल पुरस्कार’ वितरण 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 06:09 AM2024-01-20T06:09:42+5:302024-01-20T06:09:52+5:30

पुरस्कार विजेत्यांत ९ मुले आणि १० मुलींचा समावेश आहे.

The President will distribute 'National Children's Award' tomorrow | राष्ट्रपतींच्या हस्ते उद्या ‘राष्ट्रीय बाल पुरस्कार’ वितरण 

राष्ट्रपतींच्या हस्ते उद्या ‘राष्ट्रीय बाल पुरस्कार’ वितरण 

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सोमवारी १९ मुलांना असाधारण कामगिरीबद्दल ‘पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान’ करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी विजेत्या मुलांशी संवाद साधतील. 

पुरस्कार विजेत्यांत ९ मुले आणि १० मुलींचा समावेश आहे. दोन मागास (महत्त्वाकांक्षी) जिल्ह्यांसह १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ही मुले आहेत. पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२४, कला आणि संस्कृती (७), शौर्य (१), नवकल्पना (१), विज्ञान आणि तंत्रज्ञान (१), समाजसेवा (४) आणि क्रीडा (५) अशा ६ श्रेणींमध्ये दिला जाईल.

प्रत्येक पुरस्कारार्थीला पदक आणि प्रमाणपत्र दिले जाईल. यावर्षी, मंत्रालयाने प्रादेशिक आणि राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देऊन नामांकन वाढवण्यासाठी विशेष उपाययोजना केल्याचे सरकारने म्हटले आहे.

Web Title: The President will distribute 'National Children's Award' tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.