ॲनिमेटेड व्हिडीओमध्ये स्वत:ला नाचताना पाहून पंतप्रधान खूश
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 05:47 IST2024-05-08T05:47:30+5:302024-05-08T05:47:41+5:30
ममता बॅनर्जींचाही व्हिडीओ व्हायरल, मात्र त्या झाल्या नाराज; शेअर करणाऱ्याला पाेलिसांनी दिली नोटीस

ॲनिमेटेड व्हिडीओमध्ये स्वत:ला नाचताना पाहून पंतप्रधान खूश
कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे दोन वेगवेगळे नृत्याचे ॲनिमेटेड व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे हा व्हिडीओ पाहून आनंद झाला, अशी प्रतिक्रिया पंतप्रधानांनी दिली, तर ममता बॅनर्जींनी मात्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, व्हिडीओ शेअर करणाऱ्याला कोलकाता पोलिसांनी नोटीस पाठवली आहे.
व्हायरल झालेला व्हिडीओ पुन्हा शेअर करताना नरेंद्र मोदी यांनी तो सहजतेने घेत आनंद लुटला. ‘तुम्हा सर्वांप्रमाणे मलाही स्वतःला नाचताना पाहून आनंद झाला. निवडणुकीमध्ये अशी सर्जनशीलता खऱ्या अर्थाने आनंद देणारी आहे,” अशी प्रतिक्रिया पंतप्रधानांनी दिली.
कारवाईवर नागरिक नाराज
कृष्णा नावाच्या युजरने एक्स अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला. त्याला कोलकाता पोलिसांच्या गुन्हे शाखेने नोटीस पाठवली आहे. पोलिसांनी पोस्ट हटवण्यास सांगितले.
या कारवाईवरही नागरिक प्रश्न उपस्थित करीत आहेत. व्हिडीओमध्ये अश्लीलता किंवा असभ्यता नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे; पण ममता संतप्त झाल्या आणि त्यांनी पोलिसांना मागे लावले, असे त्यांचे म्हणणे आहे.
मूळ अमेरिकी रॅपर लिल यॉटीचा व्हिडीओ
nनरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांचा व्हिडीओ मूळ अमेरिकी रॅपर लिल यॉटीच्या नृत्य व्हिडीओचा आधार घेऊन बनवण्यात आला आहे. लिल यॉटीचे खरे नाव माइल्स पार्क्स मॅककोलम आहे.
nत्याचा जन्म १९९७ मध्ये जॉर्जियामधील मेबलटन येथे झाला. २०१० नंतर तो त्याच्या खास स्टाइलमुळे प्रचंड लोकप्रिय झाला आहे.