ती जागा 'आप'ला देत 'राजपुत्रा'ने सूड उगवला; भरूचच्या जागेवरून भाजपची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 08:11 AM2024-02-26T08:11:57+5:302024-02-26T08:12:15+5:30
गुजरातमधील भरूचची जागा आम आदमी पार्टीला (आप) देण्याचे जाहीर केल्यानंतर भाजपने काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : काँग्रेसने शनिवारी जागावाटप कराराचा एक भाग म्हणून गुजरातमधील भरूचची जागा आम आदमी पार्टीला (आप) देण्याचे जाहीर केल्यानंतर भाजपने काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. यातून राहुल गांधींचे 'वापरा आणि फेका' धोरण आणि 'राजपुत्राचा बदला' दिसतो, अशी टीका करत भाजपने गांधी कुटुंबीय आणि दिवंगत अहमद पटेल यांच्यातील मतभेदांवर बोट ठेवण्याचा प्रयत्न केला.
भाजपचे प्रवक्ते जयवीर शेरगिल म्हणाले : 'काँग्रेसला जीवदान देणाऱ्या अहमद पटेल यांचा गड 'आप'ला देणे म्हणजे राजपुत्राचा सूड आहे.
भरूच लोकसभा जागा आघाडीत मिळवू न शकल्याबद्दल आमच्या जिल्हा कॅडरची मनापासून माफी मागते. मी तुमच्या निराशेत सहभागी आहे; परंतु आता एकत्र येऊन अधिक मजबूत होऊन अहमद पटेल यांचा ४५ वर्षाचा वारसा आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही.
- मुमताज, अहमद पटेल यांच्या सुपुत्री
कोणतीही युती भाजपला सर्व २६ (लोकसभेच्या) जागा जिंकण्यापासून रोखू शकत नाही आणि तेही ६ लाखांहून अधिक मतांच्या फरकाने. माझा विश्वास आहे की, काँग्रेस आणि 'आप' अजूनही स्वप्न पाहत आहेत आणि वास्तव पाहायला तयार नाहीत.
- सी. आर. पाटील, प्रदेशाध्यक्ष, गुजरात भाजप