पंपावर उडाली धांदल... पेट्रोल भरलं, बटण स्टार्ट करताच स्कुटीने पेट घेतला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 03:17 PM2023-07-26T15:17:06+5:302023-07-26T15:27:03+5:30
सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास पेट्रोल पंपावर ही घटना घडली
छत्तीसगड राज्यातील दुर्ग जिल्ह्यात पेट्रोल पंपावरआगीचा भडका उडाल्याने सर्वांची धांदल उडाली होती. स्कुटीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या एका चालकासोबत ही घटना घडली. स्कुटीत पेट्रोल भरल्यानंतर संबंधित वाहनचालकाने गाडी सुरू करण्यासाठी स्टार्टर बटन दाबताच तिथे आग लागली. सेल्फ स्टार्टचे बटन दाबताच गाडीत आगीचा भडका उडाला. त्यामुळे, तो वाहनचालक तरुण गाडी जागेवरच सोडून दूर पळाला. मात्र, पेट्रोल पंपावरी कर्मचाऱ्यांमध्ये धांदल उडाली.
सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास पेट्रोल पंपावर ही घटना घडली. दुर्ग शहरातील पटेल चौक येथील पेट्रोल पंपावर एक युवक पेट्रोल भरण्यासाठी आला होता. त्याने, स्कुटीत पेट्रोल भरल्यानंतर पैस देऊन पुढे आला. त्यावेळी, बटनस्टार्ट करुन गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्टार्टचे बटन दाबताच गाडीच्या इंजिनमध्ये आग लागली. त्यामुळे, चालकाने तात्काळ गाडी जागेवर ठेऊन धूम ठोकली. मात्र, ही आग पेट्रोल पंपाजवळच असल्याने येथील कर्मचारी सैरावैरा पळू लागले.
पेट्रोल पंपावरील संपूर्ण स्टाफ यावेळी गाडीची आग विझवण्यासाठी समोर आला. काहींनी फायर टेंडरने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला तर काहींना बादलीत असलेल्या वाळूने आगीवर नियंत्रण मिळवले. तसेच, काहींनी पाईपाद्वारे पाण्याचा प्रेशरही सोडला होता. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. मात्र, आग विझेपर्यंत स्कुटी पूर्णपणे जळाली होती.
दरम्यान, आग स्कुटीच्या पेट्रोल टाकीपर्यंत पोहोचली असती तर मोठा भडका उडाला असता, त्यात पेट्रोल पंपाच्या टाकीपर्यत पोहचली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. येथील कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आणि प्रसंगावधानता दाखवल्याने मोठा अनर्थ टळला.