मुलांवरील अत्याचाराचे प्रमाण दुपटीने वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 06:33 AM2024-01-29T06:33:07+5:302024-01-29T06:33:25+5:30
Navi Delhi: लहान मुलांवरील बलात्काराच्या प्रकरणांमध्ये ९६ टक्के वाढ झाली आहे. वर्ष २०१६ ते २०२२ या कालावधीत नाेंदविण्यात आलेल्या प्रकरणांसंदर्भात ही माहिती समाेर आली आहे.
नवी दिल्ली : लहान मुलांवरील बलात्काराच्या प्रकरणांमध्ये ९६ टक्के वाढ झाली आहे. वर्ष २०१६ ते २०२२ या कालावधीत नाेंदविण्यात आलेल्या प्रकरणांसंदर्भात ही माहिती समाेर आली आहे. बाल हक्कांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या ‘चाईल्ड राईट्स अँड यू’ (क्राय) या संस्थेने ही माहिती दिली आहे. संस्थेने एनसीआरबीने दिलेल्या माहितीचे विश्लेषण करून एक अहवाल सादर केला आहे. लाेकांमध्ये जागरूकता वाढली असून स्वतंत्र हेल्पलाईन, ऑनलाइन पाेर्टल, स्वतंत्र संस्था इत्यादींमुळे विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे तक्रार नाेंदविण्यासाठी लाेक पुढे येत असल्याचे अहवालात म्हटले आहे.
२०१६पासून लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढल्या आहेत.
२०२० हे वर्ष वगळता प्रत्येक वर्षात प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.
- २०१६ पूर्वी लहान मुलांवरील बलात्काराची प्रकरणे ‘पाेक्साे’अंतर्गत विशेष कलामान्वये दाखल हाेत हाेती.
- २०१७ पासून बलात्काराची सर्व प्रकरणे स्वतंत्रपणे नाेंदविली जातात. यात ‘पाेक्साे’अंतर्गत नाेंदविण्यात आलेल्या प्रकरणांचाही समावेश केला जाताे.
जागरूकता वाढल्यामुळे तक्रार दाखल हाेण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, ती तपास यंत्रणा आणि न्यायपालिका कशा पद्धतीने हाताळते, हे महत्त्वाचे आहे. सामाजिक वातावरण, आर्थिक स्थिती इत्यादी बाबी लक्षात घेऊन मुलांविराेधातील गुन्हे राेखण्यासाठी बहुआयामी धाेरण आखायला हवे.
- शुभेंदू भट्टाचारजी, संचालक, संशाेधन व माहिती, ‘क्राय’