सर्वात श्रीमंत उमेदवार; 661 कोटींची मालमत्ता, सर्वाधिक करोडपती भाजपकडेच

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 08:33 AM2022-12-01T08:33:31+5:302022-12-01T08:34:08+5:30

काही उमेदवार गरीब असून, त्यांच्याकडे राहण्यासाठी स्वत:चे घरदेखील नाही.

The richest candidate; 661 crore assets in gujarat election | सर्वात श्रीमंत उमेदवार; 661 कोटींची मालमत्ता, सर्वाधिक करोडपती भाजपकडेच

सर्वात श्रीमंत उमेदवार; 661 कोटींची मालमत्ता, सर्वाधिक करोडपती भाजपकडेच

Next

नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचा प्रचार थांबला. पहिल्याच टप्प्यात १९ जिल्ह्यांमधील ८९ जागांसाठी मतदान हाेणार आहे. त्यासाठी तब्बल ७८८ उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी २११ उमेदवार कराेडपती असून, त्यांची सरासरी संपत्ती २.८८ काेटी रुपये आहे. काही उमेदवार गरीब असून, त्यांच्याकडे राहण्यासाठी स्वत:चे घरदेखील नाही.

सर्वाधिक कराेडपती उमेदवार भाजपचे

पहिल्या टप्प्यात सर्वाधिक कराेडपती उमेदवार भाजपचे 

३७ उमेदवारांनी पॅनबाबत माहिती दिलेली नाही

हे आहेत सर्वाधिक श्रीमंत

जयंतीभाई पटेल / भाजप 
मानसा (गांधीनगर) 
६६१ काेटी

बलवंतसिंह राजपूत / भाजप 
सिधपूर (पाटण) 
३७२ काेटी

अजितसिंह ठकाेर / आप 
दाभोई (बडाेदा) 
३४३ काेटी

हे उमेदवार आहेत कर्जात

इंद्रनील राजगुरू 
राजकाेट पूर्व 
उमेदवार : काँग्रेस संपत्ती : १६२ काेटी
कर्ज : ७६ काेटी 
गाड्या : १७ लक्झरी 
शिक्षण : बारावी

भचुभाई 
आरेठिया
कच्छमधील रापर
उमेदवार : काँग्रेस संपत्ती : ९७ काेटी
कर्ज : ३० काेटी 
गाड्या : ३ लक्झरी 
शिक्षण :  अकरावी

जगमालभाई वाला / साेमनाथ
उमेदवार : आप
संपत्ती : २५ काेटी
कर्ज : २२ काेटी 

जयेशभाई रादडिया 
जेतपूर, राजकाेट 
उमेदवार : आप
संपत्ती : ३३ काेटी
कर्ज : १८ काेटी 

जयसुखभाई देत्राेजा
जेतपूर, राजकाेट 
उमेदवार : आप
संपत्ती : ७ काेटी
कर्ज : १३ काेटी 

या उमेदवारांची संपत्ती शून्य

n महेंद्रभाई पाटनी, गांधीनगर, उत्तर अपक्ष
n सत्यमकुमार 
पटेल, नराेडा (अहमदाबाद) सरदार वल्लभभाई पटेल पार्टी 
n सतीश साेनी, आराईवाडी (अहमदाबाद) 
अपनी जनता पार्टी 

n कस्तूरभाई 
परमार, दानिलमडा (अहमदाबाद) 
प्रजा विजय पक्ष
n जीवनभाई 
परमार, साबरमती (अहमदाबाद) डेमाेक्रॅटिक भारतीय समाज पार्टी

पाच उमेदवारांनी स्वत:ची मालमत्ता शून्य असल्याचे दाखविले आहे. काही उमेदवारांकडे संपत्ती भरपूर आहे. परंतु, ते कर्जात बुडालेले आहेत. यामध्ये भाजप, काँग्रेस आणि आप या पक्षांच्या उमेदवारांचाही समावेश आहे.

Web Title: The richest candidate; 661 crore assets in gujarat election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.