हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 10:36 PM2024-10-01T22:36:39+5:302024-10-01T22:36:55+5:30
Gujarat News: हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध प्रस्थापित करत असताना एका तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुजरातमधील नवसारी येथे ही घटना घडली आहे.
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध प्रस्थापित करत असताना एका तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुजरातमधील नवसारी येथे ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमधून खूप रक्तस्राव झाला. तसेच ती बेशुद्ध झाली. तिला त्वरित रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तरुणीचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
पोस्टमार्टेमच्या अहवालानुसार शरीरसंबंध प्रस्थापित करताना तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमधून प्रमाणाबाहेर रक्तस्त्राव झाला. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी तरुणीच्या बॉयफ्रेंडला अकट केली आहे. तसेच त्याच्याकडे या घटनेची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षक सुशील अग्रवाल यांनी सांगितले की, भारतीय दंडविधानामधील कलम १०५, २३८ नुसार एक पोलीस तक्रार दाखल करण्यात आली होती. हे दोघेही शरीरसंबंध प्रस्थापित करण्यासाठी हॉटेलमध्ये गेले होते. पोस्टमार्टेम रिपोर्टमधून शरीरसंबंधांदरम्यान, तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये गंभीर दुखापत झाली. तसेच त्यामधून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचे समोर आले, अशी माहितीही त्यांनी दिले.
दरम्यान, आरोपीने ही घटना घडल्यानंतर सतर तरुणाने गंभीर जखमी झालेल्या तरुणीला रुग्णालयात नेण्याची तसदी घेतली नाही, तसेच १०८ नंबरवर फोन करून घटनेची माहितीही दिली नाही. बऱ्याच वेळानंतर तरुणीला रुग्णालयात पोहोचवण्यात आले. तोपर्यंत बराच उशीर झाला होता. या प्रकरणी आरोपी भार्गव याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी केली जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.