एल्विश यादवच्या साथीदारांकडून जप्त केलेल्या सापांना विष ग्रंथी, दात नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 05:16 PM2023-11-08T17:16:47+5:302023-11-08T18:06:52+5:30

रेव्ह पार्टी प्रकरणी बीग बॉस विजेता एल्विश यादव अडचणीत सापडला आहे.

The snakes seized by Elvish Yadav's companions have no venom glands, no teeth | एल्विश यादवच्या साथीदारांकडून जप्त केलेल्या सापांना विष ग्रंथी, दात नाहीत

एल्विश यादवच्या साथीदारांकडून जप्त केलेल्या सापांना विष ग्रंथी, दात नाहीत

गेल्या काही दिवसांपूर्वी बीग बॉस विजेता एल्विश यादव रेव्ह पार्टीमुळे अडचणीत सापडला आहे. काल एल्विश यादवची पोलिसांनी चार तास चौकशीही केली. दरम्यान, आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. पार्टीत सापाच्या विषाचा संशयास्पद वापर केल्याचं समोर आलं आहे. आता या प्रकरणातील पशुवैद्यकीय विभागाच्या तपासात अनेक नवीन बाबी समोर आल्या आहेत. गेल्या आठवड्यात सुटका करण्यात आलेल्या सर्व ९ सापांच्या विष ग्रंथी गायब असल्याचे पशुवैद्यकीय विभागाला आढळून आले आहे.

महुआ मोईत्रा आणखी अडचणीत, कॅश फॉर क्वेरी प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश 

एल्विश यादव हा लोकप्रिय शो बिग बॉस ओटीटीचा विजेता आहे. वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 120-बी अंतर्गत ६ आरोपींविरुद्ध नोंदवलेल्या एफआयआरमध्ये त्याच्या नावाचा उल्लेख आहे. हा एफआयआर गेल्या आठवड्यात नोंदवण्यात आला होता. 

मिळालेली माहिती अशी की, 'एल्विश यादव चौकशीसाठी आला. मंगळवारी साडेअकराच्या सुमारास तो पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याची सुमारे दोन तास चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. त्याला पुन्हा बोलावले जाईल. या प्रकरणी पोलिसांनी यापूर्वीच ५ आरोपींची न्यायालयाकडे कोठडी मागितली आहे.
 
डॉ. निखिल वारसाने यांनी सांगितले की, पशुवैद्यकीय विभागाने केलेल्या तपासणीत सर्व नऊ सापांच्या विष ग्रंथी गायब असल्याचे आढळून आले आहे. त्यात ५ कोब्रा सापही आहेत. या सर्वांची ३ नोव्हेंबर रोजी आरोपींच्या तावडीतून सुटका करण्यात आली. 'या नऊ सापांपैकी ८ सापांचे दातही गायब आहेत. आम्हाला वनविभागाने चौकशी करण्यास सांगितले असून पुढील कार्यवाहीसाठी आम्ही आमचा अहवाल विभागाकडे सादर केला आहे. त्यांच्या विभागाला पशुवैद्यकीय विभागाकडून अहवाल प्राप्त झाला असून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी तो न्यायालयात सादर केला जाईल.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'सर्व नऊ साप आमच्या ताब्यात होते आणि आज आम्ही न्यायालयाकडून परवानगी घेऊन त्यांना सूरजपूरच्या पाणथळ प्रदेशात सोडले आहे.' ३ नोव्हेंबरला सेक्टर ५१ मधील बँक्वेट हॉलमधून ५ जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडे नऊ सापही होते आणि त्यातील ५ कोब्रा साप होते. पोलिसांनी त्यांच्याकडून २० मिली संशयित विष जप्त केले आहे. मात्र, त्या पार्टी हॉलमध्ये एल्विश यादव उपस्थित नव्हता आणि या संपूर्ण प्रकरणातील त्याचा सहभाग तपासला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: The snakes seized by Elvish Yadav's companions have no venom glands, no teeth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस