सासूला पळवून नेणाऱ्या होणाऱ्या जावयाचा निरोप आला; '२० वर्षे झाली, आता तिला विसरून जा...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 18:49 IST2025-04-09T18:49:05+5:302025-04-09T18:49:34+5:30
पोटची मुलगी संसाराची स्वप्ने रंगवत असताना त्या स्वप्नांवर स्वार होत तिची आईच पसार झाली. उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये ही घटना घडली होती.

सासूला पळवून नेणाऱ्या होणाऱ्या जावयाचा निरोप आला; '२० वर्षे झाली, आता तिला विसरून जा...'
पोटची मुलगी संसाराची स्वप्ने रंगवत असताना त्या स्वप्नांवर स्वार होत तिची आईच पसार झाली. उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये ही घटना घडली होती. होणाऱ्या जावयासोबत सासूच पळून गेली, लग्न राहिले बाजुला असा प्रकार घडल्याने आजकाल काहीही होऊ शकते, अशा विचित्र मानसिक धक्क्यात तेथील लोक आहेत. नवरी हॉस्पिटलमध्ये दाखल आहे तर तिचे वडील म्हणजेच पळून गेलेल्या महिलेचा पती पोलिस ठाण्यात शोधण्याची मागणी करत आहे. अशातच त्या प्रतापी होणाऱ्या जावयाचा सासऱ्यासाठी निरोप आला आहे.
आईने केलेला विश्वासघात मुलगीला काही पेलवलेला नाहीय. तिने आई मेली तरी चालेल पण मला माझे दागिने आणि पैसे परत मिळावेत अशी मागणी केली आहे. तिच्या वडिलांनीही पत्नीला शोधा आणि दागिने पैसे मिळवून द्या अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. आपली आई घरातून सगळे साफ करून घेऊन गेली आहे. घरात १० रुपयेही तिने सोडलेले नाहीत. जवळपास ५ लाखांचे दागिने आणि ३.५० लाख रुपयांची रोख घेऊन ती पळाली आहे, असे मुलीचे म्हणणे आहे.
या भावनिक धोक्याची बातमी गावागावात पसरताच तिकडून सासूला पळवून नेणाऱ्या जावयाचा निरोप आला आहे. यामध्ये त्याने सासऱ्याला पत्नीला विसरून जा असे सांगितले आहे. तुम्ही तिला खूप त्रास दिला आहे. २० वर्षे झालीत लग्नाला आता हिला विसरून जा, असा निरोप जावयाने दिला आहे.
येत्या १६ एप्रिलला मुलीचे लग्न होते. त्यापूर्वीच मुलगी आजारी पडल्याने तिला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. मुलीची आई आणि होणारा जावई यांच्यातच काही काळापूर्वी सूत जुळले होते. याची भनक पण मुलीला आणि महिलेच्या पतीला नव्हती. नवरी मुलगी हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याची संधी साधून तिच्या आईने जावयासोबत पलायन केले आहे. पलायने केलेल्या सासूने नुकताच जावयाला स्मार्टफोन घेऊन दिला होता. नवरी मुलगी नाही तर ती आणि होणारा जावईच फोनवर जास्त बोलायचे. यामुळे त्यांचे सूत जुळले. ती १५-१५ तास त्याच्याशी फोनवर बोलायची. नवरा बाहेरगावी असल्याने त्याच्याही या गोष्टी लक्षात आल्या नाहीत. आता मुलगी बिनलग्नाची आणि बायको गायब झाली अशी अवस्था त्याची झाली आहे. गावागावात आता या विश्वासघाताच्या प्रकरणाची चर्चा सुरु आहे.