शिंदे गटाने मांडली लोकसभा अध्यक्षांकडे बाजू; ठाकरे गटाने मात्र मागितली वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 12:05 PM2022-08-09T12:05:29+5:302022-08-09T12:08:03+5:30

लोकसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या १२ खासदारांनी आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले होते.

The Speaker of the Lok Sabha had directed 12 MPs from the Shinde group to present their views. | शिंदे गटाने मांडली लोकसभा अध्यक्षांकडे बाजू; ठाकरे गटाने मात्र मागितली वेळ

शिंदे गटाने मांडली लोकसभा अध्यक्षांकडे बाजू; ठाकरे गटाने मात्र मागितली वेळ

Next

नवी दिल्ली : लोकसभेतील शिवसेनेच्या गटनेतेपदावरून सुरू झालेल्या वादाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या खासदारांनी सोमवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहेत. गेल्या १९ जुलैला लोकसभेतील शिवसेनेच्या गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची निवड केली होती. या निवडीवर ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत यांनी आक्षेप घेतला होता. या निवडीमध्ये नैसर्गिक न्यायाची पायमल्ली झालेली आहे, असा आक्षेप नोंदविला होता. 

यावरून लोकसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या १२ खासदारांनी आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले होते. यानुसार शिंदे गटाच्या बाराही खासदारांनी वकीलांमार्फत हे निवेदन दिले आहेत. यात १८ पैकी १२ खासदारांनी एकमताने गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची निवड केल्याचा दावा केला आहे. शिवसेना खरी कोणती यावरून निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शिंदे गटाने प्रतिज्ञापत्र दाखल केल्याची माहिती लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते राहुल शेवाळे यांनी दिली. 

ठाकरे गटाने मागितली वेळ

ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची काही वेळ मागून घेतला आहे. सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तसेच सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याने यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

Web Title: The Speaker of the Lok Sabha had directed 12 MPs from the Shinde group to present their views.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.