वेगवान सुमो हॉटेलमध्ये घुसली, अनेकांना चिरडले, चार जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 10:50 PM2022-03-15T22:50:36+5:302022-03-15T22:53:22+5:30

Accident News: बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये वेगवान टाटा सुमो हॉटेलमध्ये घुसून भीषण अपघात झाला आहे. रस्त्याशेजारी असलेल्या हॉटेलमध्ये भरधाव सुमो घुसल्याने अनेकजण चिरडले गेले.

The speeding sumo broke into the hotel, crushing several, killing four | वेगवान सुमो हॉटेलमध्ये घुसली, अनेकांना चिरडले, चार जणांचा मृत्यू 

वेगवान सुमो हॉटेलमध्ये घुसली, अनेकांना चिरडले, चार जणांचा मृत्यू 

Next

पाटणा - बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये वेगवान टाटा सुमो हॉटेलमध्ये घुसून भीषण अपघात झाला आहे. रस्त्याशेजारी असलेल्या हॉटेलमध्ये भरधाव सुमो घुसल्याने अनेकजण चिरडले गेले. ही घटना मीनापूरमधील पानापूर ओपी क्षेत्रातील नॅशनल हायवे क्रमांक २६ वर घडली. यात चार जणांचा मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले. या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

अपघातानंतर घटनास्थळावर आरडाओरडा सुरू झाला. त्यामुळे आसपासच्या लोकांनी घटनास्थळी घाव घेतली. त्यांनी जखमींना मदत केली. सध्या घटनास्थळावरून जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  
 

Web Title: The speeding sumo broke into the hotel, crushing several, killing four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.