कुस्तीपटूंच्या आंदोलनावर क्रीडामंत्री पहिल्यांदाच बोलले, आरोप गंभीर असल्याचे सांगत सूचक संकेत दिले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 09:40 PM2023-01-19T21:40:24+5:302023-01-19T21:40:48+5:30
Anurag Thakur: कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी तीव्र आंदोलन पुकारले आहे. दरम्यान, या आंदोलनाबाबत केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.
नवी दिल्ली - कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी तीव्र आंदोलन पुकारले आहे. दरम्यान, या आंदोलनाबाबत केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, भारतीय क्रीडा महासंघाला क्रीडा मंत्रालयाने नोटिस पाठवली आहे. त्यांना ७२ तासांमध्ये उत्तर द्यावं लागेल. त्याशिवा त्यांनी सांगितले की, खेळ आणि खेळाडूंसाठी भारत सरकारने चांगलं काम केलं आहे. तसेच खेळाडूंनीही चांगला खेळ केला आहे.
क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, मी खेळाडूंना भेटून त्यांच्याशी बोलणार आहे. मी माझे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, सरकारने हा विषय खूप गांभीर्याने घेतला आहे. तसेच जे आरोप लागले आहेत, त्यांची चौकशी झाली पाहिजे. कुस्ती महासंघाच्या उत्तराची आम्ही वाट पाहत आहोत. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
अनुराग ठाकूर यांनी पुढे सांगितले की, आम्ही नेहमी खेळाडूंसोबत आम्ही सातत्याने भेटत असतो. आम्ही खेळांमध्ये पारदर्शकपणा आणण्याचं काम केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये खेळांना प्रोत्साहन देण्याचं जे काम झालं आहे. ते गेल्या ७५ वर्षांत कधीही झालेलं नाही. केंद्र सरकारने कसं काम केलंय, हे खेळाडूंनाही माहिती आहेत.