राज्याला ४ राष्ट्रपती, ४४ पोलिस पदके; चार पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवापदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 06:36 IST2025-01-26T06:35:43+5:302025-01-26T06:36:26+5:30

राज्यातून चंद्रकिशोर मीना आणि आरती सिंह या अधिकारी दाम्पत्याला एकाचवेळी पुरस्कार जाहीर झाले आहेत.

The state has received 4 Presidents and 44 Police medals | राज्याला ४ राष्ट्रपती, ४४ पोलिस पदके; चार पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवापदक

राज्याला ४ राष्ट्रपती, ४४ पोलिस पदके; चार पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवापदक

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली :  राज्यातील ४ पोलिस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवापदक’, तर ४४ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे पदक’  (एमएसएम) जाहीर झाले आहेत. यातील ३९ पोलिस पदके ‘गुणवत्तापूर्ण सेवे’साठी तर पाच पदके कारागृहात सेवा बजावणाऱ्या पोलिस अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांना सुधारात्मक सेवांच्या श्रेणीत गुणवत्तापूर्ण सेवेसाठी (एमएसएम) जाहीर झाली आहेत.

यावर्षी एकूण ९४२ ‘पोलिस पदके’ जाहीर झाली असून देशभरातील एकूण १०१ पोलिसांना ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवापदक' (पीएसएम), ९५ पोलिसांना ‘पोलिस शौर्य पदक’(पीएमजी) आणि ७४६ पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी (एमएसएम) पोलिस पदके जाहीर करण्यात आली आहेत.  यावर्षी राज्यातून चंद्रकिशोर मीना आणि आरती सिंह या अधिकारी दाम्पत्याला एकाचवेळी पुरस्कार जाहीर झाले आहेत.

राष्ट्रपती विशिष्ट सेवेसाठी पदक (पीएसएम)
देशातील पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवापदक’ जाहीर झाली असून यात महाराष्ट्रातील चार अधिकारी -कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. त्यांची नावे अशी.
१. डॉ. रवींद्र कुमार झिले सिंग सिंगल
-अतिरिक्त महासंचालक
२. दत्तात्रय राजाराम कराळे
- पोलिस महानिरीक्षक
३. सुनील बळिरामजी फुलारी
-पोलिस महानिरीक्षक
४. रामचंद्र बाबू केंडे - पोलिस कमांडंट

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदके (एमएसएम)
१. संजय भास्कर दराडे, महानिरीक्षक
२. वीरेंद्र मिश्रा, महानिरीक्षक
३. आरती प्रकाश सिंह, महानिरीक्षक
४. चंद्र किशोर रामजीलाल मीना, महानिरीक्षक
५. दीपक कृष्णाजी साकोरे, उपमहानिरीक्षक
६. राजेश रामचंद्र बनसोडे, पोलिस अधीक्षक
७. सुनील जयसिंग तांबे, पोलिस उपअधीक्षक
८. ममता लॉरेन्स डिसुझा, सहायक पोलिस आयुक्त
९. धर्मपाल मोहन बनसोडे, सहायक पोलिस आयुक्त
१०. मधुकर माणिकराव सावंत, निरीक्षक
११. राजेंद्र कारभारी कोते, निरीक्षक
१२. रोशन रघुनाथ यादव, पोलिस उपअधीक्षक
१३. अनिल लक्ष्मण लाड, पोलिस उपअधीक्षक
१४. अरुण केरभाऊ डुंबरे, सहायक पोलिस आयुक्त
१५. नजीर नसीर शेख, उपनिरीक्षक
१६. श्रीकांत चंद्रकांत तावडे, उपनिरीक्षक
१७. महादेव गोविंद काळे, उपनिरीक्षक
१८. तुकाराम शिवाजी निंबाळकर, उपनिरीक्षक
१९. आनंदराव पुंजाराव मस्के, सहायक उपनिरीक्षक
२०. रवींद्र बाबुराव वानखेडे, उपनिरीक्षक
२१. सुरेश चिंतामण मनोरे, निरीक्षक
२२. राजेंद्र देवमान वाघ, उपनिरीक्षक
२३. संजय अंबादासराव जोशी, सहा. उपनिरीक्षक
२४. दत्तू एकनाथ गायकवाड, 
सहायक उपनिरीक्षक
२५. नंदकिशोर ओंकार बोरोले, सहायक उपनिरीक्षक
२६. आनंद रामचंद्र जंगम, सहायक उपनिरीक्षक
२७. सुनीता विजय पवार, सहायक उपनिरीक्षक
२८. जितेंद्र विठ्ठल म्हात्रे, सहायक उपनिरीक्षक
२९. प्रफुल्ल रामचंद्र सुर्वे, सहायक उपनिरीक्षक
३०. राजेंद्र शंकर काळे, सहायक उपनिरीक्षक
३१. सलीम गनी शेख, सहायक उपनिरीक्षक
३२. तुकाराम रावसाहेब आव्हाळे, सहायक उपनिरीक्षक
३३. रामभाऊ संभाजी खंडागळे, हेड कॉन्स्टेबल
३४. संजय भास्करराव चोबे, प्रमुख कॉन्स्टेबल
३५. सय्यद इक्बाल हुसेन सय्यद माथार हुसेन, सहायक उपनिरीक्षक
३६. विजय दामोदर जाधव, हेड कॉन्स्टेबल
३७. रामराव वामनराव नागे, सहायक उपनिरीक्षक
३८. दिलीप भोजुसिंग राठोड, हेड कॉन्स्टेबल
३९. आयुबखान अकबर मुल्ला, हेड कॉन्स्टेबल

सुधारात्मक सेवा - गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (एमएसएम)

१. विवेक वसंत झेंडे, अतिरिक्त अधीक्षक
२. अहमद शमशुद्दीन मणेर, हवालदार
३. गणेश महादेव गायकवाड, हवालदार
४. प्रल्हाद दत्तात्रय कुदळे, हवालदार
५. तुळशीराम काशिनाथ गोरावे, हवालदार

Web Title: The state has received 4 Presidents and 44 Police medals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.