संबित पात्रांचे वक्तव्य बनले प्रचाराचा मुद्दा
By प्रसाद कुलकर्णी | Updated: May 23, 2024 13:09 IST2024-05-23T13:09:31+5:302024-05-23T13:09:53+5:30
पात्रा यांच्याबरोबरच काँग्रेसचे जय नारायण पटनायक आणि बिजू जनता दलाचे अरुप पटनायक या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २५ मे रोजी या ठिकाणी मतदान होत आहे.

संबित पात्रांचे वक्तव्य बनले प्रचाराचा मुद्दा
प्रसाद कुलकर्णी -
भगवान जगन्नाथ यांच्यासंबंधी वक्तव्याने पुरी येथील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संबित पात्रा चर्चेत आले. पात्रा यांच्याबरोबरच काँग्रेसचे जय नारायण पटनायक आणि बिजू जनता दलाचे अरुप पटनायक या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २५ मे रोजी या ठिकाणी मतदान होत आहे.
अरुप पटनायक मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आहेत. २०१९च्या निवडणुकीतही ते लढले होते. पण, त्यांचा भाजपच्या अपराजिता सारंगी यांनी पराभव केला होता. संबित पात्रा यांनी केलेले वक्तव्य हाच सध्या तेथील महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असली, तरी विरोधकांना टीकेसाठी मुद्दा मिळाला आहे. काँग्रेस आणि बीजेडीसुद्धा भाजपला त्यावरून लक्ष्य करीत आहेत. भाजप आणि बीजेडी यांच्यातच प्रमुख लढत येथे आहे. तृणमूल काँग्रेसनेही पात्रा यांच्यावर टीका करत माफी मागा असे म्हटले आहे.
इतर काही मुद्दे
पायाभूत सुविधांचा विकास, स्थानिक समस्यांवर लक्ष, आर्थिक विकासाचे मुद्दे मतदारसंघामध्ये चर्चेला आहेत.
रेल्वे, महामार्ग, पूल, पिण्याच्या पाण्याच्या योजना आदींबाबतचे प्रगती पुस्तक पात्रा यांच्याकडून सादर.
चार धाम पैकी पुरी एक असल्याने मतदारसंघाला राजकीय महत्त्व. स्थानिक विकासाचे मुद्दे प्रकर्षाने चर्चेला.
पात्रा हे बाहेरील उमेदवार असल्याचा आणि पराभवानंतर दिल्लीतच राहिल्याचा आरोप त्यांच्यावर होता. त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
२०१९ मध्ये काय झाले?
पिनाकी मिश्रा, बीजेडी (विजयी) - ५,३८,३२१
संबित पात्रा - भाजप - ५,२६,६०७