विद्यार्थिनी आणि प्राध्यापिका १५ फूट खड्ड्यात उतरल्या, तेवढ्यात वरून कोसळली माती, विद्यार्थिनीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 03:38 PM2024-11-27T15:38:48+5:302024-11-27T15:39:07+5:30
Gujarat News: गुजरातमधील ऐतिहासिक लोथल येथील पुरातत्विय साईटवर एक दु:खद घटना घडली आहे. येथे संशोधन साईटवर झालेल्या भूस्खलनामध्ये एक विद्यार्थिनी आणि प्राध्यापिका मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या.
गुजरातमधील ऐतिहासिक लोथल येथील पुरातत्विय साईटवर एक दु:खद घटना घडली आहे. येथे संशोधन साईटवर झालेल्या भूस्खलनामध्ये एक विद्यार्थिनी आणि प्राध्यापिका मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या. मिळालेल्या माहितीनुसार प्राध्यापिका यामा दीक्षित आणि पीएचडी स्टुडंट सुरभी वर्मा नमुने घेण्यासाठी खड्ड्यात उतरल्या होत्या. मात्र अचानक माती कोसळली. त्यात या दोघीही ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या. या दुर्घटनेत सुरभी वर्मा यांचा मृत्यू झाला. तर प्राध्यापिका यामा दीक्षित यांना वाचवण्यात यश आलं आहे. यामा यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही शास्त्रज्ञ लोथल येथे मातीचे नमुने घेण्यासाठी गेले होते.
दिल्ली आणि गांधीनगर येथून एक टीम धोलका येथील हडप्पा संस्कृतीमधील स्थळ असेलल्या लोथल येथे संशोधनासाठी आली होती. दरम्यान, यामा दीक्षित आणि सुरभी वर्मा ह्या मातीचे नमुने मिळवण्याासाठी १५ फूट खोल खड्ड्यात उतरल्या. याचदरम्यान, मातीचा ढिगारा वरून त्यांच्यावर कोसळला. त्यात त्या गाडल्या गेल्या. या दुर्घटनेत सुरभी वर्मा यांचा मृत्यू झाला. तर यामा दीक्षित यांना वाचवण्यात यश आलं.
मिळालेल्या माहितीनुसार लोथल येथे दिल्लीतील एक सहाय्यक प्राध्यापिका आणि एक विद्यार्थिनी नमुने घेण्यासाठी आले होते. मागच्या तीन दिवसांपासून ते वेगवेगळ्या परिसरांमधून नमुने गोळा करत होते. आज सकाळीही त्यांच्याकडून लोथल येथील एका ठिकाणी १५ फूट खोल खड्डा खोदून त्यामधून मातीचे नमुने घेण्याचं काम सुरू होतं. मात्र त्याच वेळी मातीचा मोठा ढिगारा अचानक कोसळला. त्यात सुरभी वर्मा यांचा मृत्यू झाला. तर प्राध्यापिका यामा दीक्षित या किरकोळ जखमी झाल्या.