विद्यार्थ्यांने जानवे काढले नाही, म्हणून परीक्षेला बसवले नाही; कॉलेजच्या प्राचार्य अन् कर्मचाऱ्यांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 10:31 IST2025-04-20T10:22:39+5:302025-04-20T10:31:19+5:30
१७ एप्रिल रोजी बिदर येथील साई स्फुर्ती पीयू कॉलेजमध्ये कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट (CET) देण्यासाठी गेल्यावर सुचिव्रत कुलकर्णी या विद्यार्थ्याला जानवे काढण्यास सांगितले, तो काढला नाही म्हणून परिक्षेला बसू दिले नाही, असा आरोप केला होता.

विद्यार्थ्यांने जानवे काढले नाही, म्हणून परीक्षेला बसवले नाही; कॉलेजच्या प्राचार्य अन् कर्मचाऱ्यांवर कारवाई
कर्नाटकातील एका विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी जानवे काढण्यास सांगण्यात आले. १७ एप्रिल रोजी बिदर येथील साई स्फुर्ती पीयू कॉलेजमध्ये कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट (CET) देण्यासाठी गेल्यावर सुचिव्रत कुलकर्णी या विद्यार्थ्याने त्याचे जानवे काढण्यास सांगितले होते, तो काढला नाही म्हणून परीक्षेला बसू दिले नाही, असा आरोप केला आहे.
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
विद्यार्थ्याने सांगितले की, परीक्षा केंद्रावर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याला सांगितले की जर त्याने जानवे काढले नाही तर त्याला परीक्षेला बसू दिले जाणार नाही. विद्यार्थ्याने जानवे धार्मिक प्रतीक असल्याचे सांगून तो काढण्यास नकार दिल्यानंतर त्याला परीक्षेला बसण्यापासून रोखण्यात आले. दरम्यान, आता या प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे.
विद्यार्थ्याला परीक्षेला बसण्यापासून रोखल्याबद्दल साई स्पृती पीयू कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर बिरादार आणि कर्मचारी सतीश पवार यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
विद्यार्थी सुचिव्रत कुलकर्णीची आई नीता कुलकर्णी यांनीही या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी म्हटले होते की, माझ्या मुलाने सांगितले होते की, तो जानवे काढू शकत नाही कारण ते धार्मिक श्रद्धेशी संबंधित आहे. तरीही, त्याला परीक्षेतून काढून टाकण्यात आले. हे खूप चुकीचे होते.
आईची मोठी मागणी
विद्यार्थ्याच्या आईने सरकारकडे मागणी केली होती की तिच्या मुलाची पुनर्परीक्षा घ्यावी किंवा त्याला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश द्यावा आणि त्याची फी सरकार किंवा संबंधित महाविद्यालयाने भरावी.