"तामिळनाडू सरकारला वाटलं असेल की…", ₹ चिन्ह हटवण्याचा निर्णयाबाबत या चिन्हाचे निर्माते उदय कुमार यांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 21:01 IST2025-03-13T21:00:46+5:302025-03-13T21:01:04+5:30
D. Uday Kumar News: तामिळनाडू सरकारने घेतलेल्या या निर्णयाबाबत या चिन्हाचे निर्माते आणि आयआयटी गुवाहाटीचे प्राध्यापक डी. उदय कुमार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

"तामिळनाडू सरकारला वाटलं असेल की…", ₹ चिन्ह हटवण्याचा निर्णयाबाबत या चिन्हाचे निर्माते उदय कुमार यांचं विधान
तामिळनाडू सरकारने आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना रुपयासाठी नवं चिन्ह प्रसिद्ध केलं. तामिळनाडू सरकारने उचललेल्या या पावलामुळे देशभरात उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, तामिळनाडू सरकारने घेतलेल्या या निर्णयाबाबत या चिन्हाचे निर्माते आणि आयआयटी गुवाहाटीचे प्राध्यापक डी. उदय कुमार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. उदय उदय कुमार यांनी या संपूर्ण वादात पडण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.
प्राध्यापक उदय कुमार म्हणाले की, ते म्हणाले की, या निर्णयाबाबत माझ्याजवळ कुठलीही प्रतिक्रिया नाही आहे. सरकारला अचानक वाटलं असेल की, बदलाची आवश्यकता आहे, तसेच त्यांना आपला धोरण राबवायचं असेल, म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असावा. त्यामुळे माझ्याकडे याबाबत सांगण्यासारखं काहीही नाही आहे. हा निर्णय संपूर्णपणे सरकारवर अवलंबून आहे.
उदय कुमार यांनी डीएमकेशी असलेला संबंध आणि वडिलांबाबतही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, माझे वडील माझ्या जन्मापूर्वीच आमदार होते. आता ते वृद्ध झाले असून, आमच्या गावात शांतपणे आपलं जीवन जगत आहेत. हा केवळ योगायोग आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, तामिळनाडूत पेटलेल्या हिंदी भाषेविरोधातील वादादरम्यान तामिळनाडू सरकारने एक मोठं पाऊल उचललं आहे. तामिळनाडूमधील स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पामधून '₹' चिन्ह हटवलं आहे. तसेच त्या चिन्हाची जागा 'ரூ' या चिन्हाने घेतली आहे. देशामध्ये देशभरात '₹' चिन्ह अर्थसंकल्पाचं अधिकृत प्रतिक आहे. मात्र तामिळनाडू सरकारने तेही बदलून टाकलं आहे. ₹ या चिन्हाच्या जागी ज्या ரூ चिन्हाची जागा घेण्यात आली आहे, ते तामीळ लिपीमधील रु अक्षर आहे. तसेच कुठल्याही राज्याने '₹' चिन्ह बदलून त्याजागी आपलं चिन्ह देण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे.