६ हजार मीटर समुद्राच्या खोलीत जाणार टीम; काय आहे भारताचं मिशन 'समुद्रयान'?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 03:23 PM2023-03-22T15:23:45+5:302023-03-22T15:24:58+5:30

टाइटेनियमपासून बनवलेली ही अत्याधुनिक पाणबुडी आहे. यातील ६० टक्के भाग स्वदेशी बनावटीचा आहे

The team will go to the depth of 6 thousand meters of sea; What is India's mission 'Samudrayaan'? | ६ हजार मीटर समुद्राच्या खोलीत जाणार टीम; काय आहे भारताचं मिशन 'समुद्रयान'?

६ हजार मीटर समुद्राच्या खोलीत जाणार टीम; काय आहे भारताचं मिशन 'समुद्रयान'?

googlenewsNext

नवी दिल्ली - समुद्रातील तळाशी असलेला खजिना आणि गूढ रहस्यांचा शोध घेण्यासाठी भारताचं मिशन समुद्रयान सुरू झाले आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी (NIOT), चेन्नईने यासाठी एक विशेष पाणबुडी विकसित केली आहे. मत्स्य ६०००. यातून तीन तज्ज्ञांची टीम समुद्रात ६००० मीटर खोलवर उतरेल, ज्याचा उद्देश ब्लू इकॉनॉमीसाठी संधी शोधणे हा आहे.

कशी झाली सुरुवात?
याआधी वैज्ञानिकांनी ५०० मीटर खोल जाणारी पाणबुडी बनवली. बंगालच्या खाडीत सागर निधी जहाजातून त्याची चाचणी झाली. याच्या यशस्वी चाचणीनंतर २०२१ ला ग्रीन सिग्नल मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वातंत्र्यदिनी याचा उल्लेख केला होता. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी या मिशनचा भाग आहे. ६ हजार कोटींची ही योजना असून आतापर्यंत ४ हजार ७७ कोटी खर्च झाल्याची माहिती आहे. 

टाइटेनियमपासून बनवलेली ही अत्याधुनिक पाणबुडी आहे. यातील ६० टक्के भाग स्वदेशी बनावटीचा आहे. या पाणबुडीचं व्यास २.१ मीटर आहे. त्यात पॉलिमेटेलिक मॅगजीन, नोड्यूल, हाइड्रेट्स गॅस, हाइड्रो थर्मल सल्फाइड उपलब्ध आहे. त्याचसोबत रडार आणि भूकंपविरहित उपकरणाचा यात समावेश आहे. हे समुद्रयान ३ जणांना समुद्राच्या तळाशी घेऊन जाईल. १२ कॅमेऱ्याच्या माध्यमातून मत्स्य ६००० ची प्रक्रिया पूर्ण होईल. जवळपास ९६ तास ही पाणबुडी ६ हजार मीटर समुद्रात राहू शकते. २०२३ च्या अखेरपर्यंत ५०० मीटरची पहिली चाचणी होईल. डिसेंबर २०२४ पर्यंत पाणबुडीच्या सर्व चाचणी पार पडतील. २०२६ पर्यंत हे मिशन पूर्ण होण्याची शक्यता आहे. 

ब्ल्यू इकोनॉमी...
भारताला एकूण ७ हजार ५१७ किमी समुद्रकिनारा लाभला आहे. त्यात ९ समुद्रकिनारी राज्ये आणि १३८२ बेटे आहेत. या मिशनमुळे ब्ल्यू इकोनॉमी मजबूत केली जाणार आहे. मत्स्य पालन आणि जलकृषी यातून विकसित होईल. समुद्रात असणारे गॅस हाइड्रेट्स, पॉलिमेटेलिक, मॅगनीज, हाइड्रो थर्मल सल्फाइड आणि कोबाल्ट क्रस्ट खनिजे सापडण्याची शक्यता आहे. १००० ते ५५०० मीटर खोलीवर या गोष्टी आढळतात. यातून देशाच्या इकोनॉमीला बूस्टर डोस मिळेल. 

Web Title: The team will go to the depth of 6 thousand meters of sea; What is India's mission 'Samudrayaan'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.