गंगाेत्रीची जागा ठरविणार सत्तेचा कल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 06:54 AM2022-01-25T06:54:25+5:302022-01-25T06:54:49+5:30

मुख्यमंत्री पराभूत हाेण्याची परंपरा धामी माेडणार का?

The tendency of power to decide the place of Gangatri | गंगाेत्रीची जागा ठरविणार सत्तेचा कल

गंगाेत्रीची जागा ठरविणार सत्तेचा कल

Next

डेहराडून : उत्तराखंडमध्ये जवळपास बहुतांश जागांवर भारतीय जनता पार्टी आणि काॅंग्रेसने उमेदवार जाहीर केले आहेत. या राज्यात विद्यमान मुख्यमंत्री पराभूत झाले आहेत. ही परंपरा माेडण्याच्या इराद्याने मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. हरिद्वार, नैनिताल,  खातिमा, श्रीनगर आणि चक्रता या ठिकाणी लक्षवेधक लढती हाेण्याची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री धामी हे खातिमा मतदारसंघातून लढत आहेत. त्यांच्याविराेधात काॅंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष भूवनचंद्र कापरी यांचे पुन्हा एकदा आव्हान आहे. धामी यांनी २०१७ मध्ये कापरी यांना पराभूत केले हाेते. 

हरिद्वारमध्ये चुरस
भाजपचे प्रदेशाध्यक्ष मदन काैशिक हे सलग चार वेळा हरिद्वार येथून विजयी झाले आहेत. त्यांच्यासमाेर काॅंग्रेसचे सतपाल ब्रह्मचारी यांचे आव्हान आहे. ब्रह्मचारी यांनी २०१२ मध्येही त्यांच्याविराेधात निवडणूक लढविली हाेती. 

गंगोत्रीकडे लक्ष
हरीश रावत आणि हरक रावत हे यंदा कुठून निवडणूक लढविणार याबाबत अद्याप कुतूहल कायम आहे. गंगोत्री मतदारसंघात जिंकणारा पक्ष सरकार स्थापन करतो, अशी परंपरा राहिली आहे. 

Web Title: The tendency of power to decide the place of Gangatri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.