दोन महिन्यांत तिसऱ्या चित्त्याचाही झाला मृत्यू, मादी चित्ता दक्षने घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 10:34 AM2023-05-10T10:34:21+5:302023-05-10T10:34:55+5:30
दक्षिण आफ्रिकेतून मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये स्थलांतरित केलेल्या मादी चित्ता ‘दक्ष’चा मंगळवारी मृत्यू झाला.
भोपाळ : दक्षिण आफ्रिकेतून मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये स्थलांतरित केलेल्या मादी चित्ता ‘दक्ष’चा मंगळवारी मृत्यू झाला, असे वन अधिकाऱ्याने सांगितले. कुनो नॅशनल पार्कमध्ये मृत्युमुखी पडणारा हा तिसरा चित्ता आहे.
यापूर्वी २७ मार्च आणि २३ एप्रिलला एका मादी आणि नर चित्त्याचा मृत्यू झाला होता. नॅशनल पार्कमधील देखरेख पथकाला हा चित्ता सकाळी जखमी अवस्थेत दिसला. त्याला तातडीने आवश्यक ते औषधोपचार देण्यात आले; पण दुपारी १२ च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
गर्लफ्रेंडच्या घरात घुसून राडा घातला; कोर्टाची शिक्षा ऐकून बॉयफ्रेंड नाचू लागला
दक्षला बंदिस्त अधिवास क्रमांक १ मध्ये सोडण्यात आले होते, तर वायू आणि अग्नी या दोन नर चित्त्यांना अन्य अधिवास क्षेत्रातून या क्षेत्रात संबंध ठेवण्यासाठी सोडण्यात आले होते. परंतु, या प्रक्रियेदरम्यान नर चित्ता हिंसक झाल्याचे दिसून येते. ही एक सामान्य घटना आहे. अशा स्थितीत देखरेख पथकाला हस्तक्षेप करणे अवघड आहे. साशा आणि उदय नावाच्या चित्त्यांना सप्टेंबर २०२२ मध्ये नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून येथे आणण्यात आले होते. पण, २७ मार्च आणि २३ एप्रिलला त्यांचा मृत्यू झाला.