भारतीय सैन्यात मोठ्या प्रमाणात चिनी घुसखोरीचा धोका?; सुरक्षा यंत्रणेत खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 10:37 PM2022-03-29T22:37:33+5:302022-03-29T22:37:49+5:30

आता चिनी कंपन्यांचे प्रतिनिधी नेपाळमधील गावोगावी पोहोचत आहेत आणि खाते उघडल्यावर २००० नेपाळी रुपये देऊन आमिष दाखवण्याचाही प्रयत्न करत आहेत.

The threat of massive Chinese infiltration into the Indian Army ?; Sensation in the security system | भारतीय सैन्यात मोठ्या प्रमाणात चिनी घुसखोरीचा धोका?; सुरक्षा यंत्रणेत खळबळ

भारतीय सैन्यात मोठ्या प्रमाणात चिनी घुसखोरीचा धोका?; सुरक्षा यंत्रणेत खळबळ

Next

नवी दिल्ली – चीनमधील डिजिटल वॉलेट अलीपे(AliPay) च्या नेपाळ एन्ट्रीनं भारतीय सुरक्षा व्यवस्था चिंतेत आल्या आहेत. कारण नेपाळमध्ये मोठ्या संख्येने विद्यमान आणि सेवानिवृत्त भारतीय लष्करी सैन्याचे कर्मचारी राहतात. ज्यांना भारतीय लष्कर पगार अथवा पेंशन देते. जर या सर्व माजी सैनिकांचे अकाऊंट्स चीनच्या डिजिटल वॉलेटशी जोडले गेले तर मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टममध्ये चीनी घुसखोरी, हॅकिंग आणि हेरगिरीचा जुना इतिहास पाहता हा धोका वाढला आहे.

चीनच्या डिजिटल मोबाईल अ‍ॅपमुळे भारत सतर्क

२०२० मध्ये नेपाळमध्ये चीनच्या डिजिटल मोबाइल अ‍ॅपला मान्यता मिळाली. मात्र चिनी पर्यटकांच्या माध्यमातून त्यांचा नेपाळमध्ये बेकायदेशीर पसार झाला होता. नेपाळने २०१९ मध्ये नेपाळमध्ये चिनी डिजिटल वॉलेट अ‍ॅपवरही बंदी घातली होती. परंतु अली पे आणि व्ही चॅटने मंजुरीसाठी अधिकृत अर्ज दिला. नेपाळने २०२० मध्ये या दोन्ही प्लॅटफॉर्मला मंजुरी दिली. हिमालयन बँक ऑफ नेपाळच्या सहकार्याने डिजिटल वॉलेट चालवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अली पे दोन वर्षांनंतरही नेपाळमध्ये लोकप्रिय नाही

मात्र अली पे दोन वर्षांनंतरही नेपाळमध्ये लोकप्रियता मिळाली नाही. आता चिनी कंपन्यांचे प्रतिनिधी नेपाळमधील गावोगावी पोहोचत आहेत आणि खाते उघडल्यावर २००० नेपाळी रुपये देऊन आमिष दाखवण्याचाही प्रयत्न करत आहेत. खरा धोका असा आहे की, खाते उघडताना ग्राहकाला त्याचा पासपोर्ट, बँक खाती आणि व्यवहारासारखी सर्व माहिती चायनीज कंपनीला द्यावी लागेल.

भारतीय सैन्यात ३० हजार नेपाळी तरुण

भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या चिंतेची बाब म्हणजे सुमारे ३० हजार नेपाळी युवक भारतीय लष्करात काम करतात. याशिवाय इतर अनेक राज्य पोलीस आणि निमलष्करी दलातही नेपाळी नागरिक काम करतात. नेपाळमध्ये राहणाऱ्या भारतीय लष्करातील निवृत्त सैनिकांची संख्या लाखांवर जाते.

सायबर हेरगिरीसाठी चीन कुप्रसिद्ध

या सर्व सैनिक आणि माजी सैनिकांशी संबंधित माहिती चिनी कंपनीपर्यंत पोहोचल्यास नवीन समस्या निर्माण होऊ शकतात. सायबर हेरगिरी आणि गुन्ह्यांसाठी चीन जगभर कुप्रसिद्ध आहे. चिनी कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या हेतूवर अनेकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. चिनी सैन्य अनेक दिवसांपासून सायबर हल्ल्यासाठी तयार आहे. या डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून चीन भारतीय लष्कराच्या मोठ्या भागात घुसखोरी करू शकतो.

Web Title: The threat of massive Chinese infiltration into the Indian Army ?; Sensation in the security system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.