मुहूर्त ठरला, वऱ्हाडी जमले, पण नवरीने ऐनवेळी फिल्मी स्टाईलमध्ये थांबवलं लग्न, मग झाली प्रियकराची एंट्री, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 12:25 PM2023-02-13T12:25:31+5:302023-02-13T12:26:18+5:30

Marriage: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथून एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे लग्नादिवशी लग्न ठरवलेल्या नवऱ्याच्या गळ्यात वरमाला न घालता प्रियकराच्या गळ्यात माळ घातली.

The time was fixed, the bride and groom gathered, but the bride stopped the wedding just in time in a filmy style, then the boyfriend entered, after that... | मुहूर्त ठरला, वऱ्हाडी जमले, पण नवरीने ऐनवेळी फिल्मी स्टाईलमध्ये थांबवलं लग्न, मग झाली प्रियकराची एंट्री, त्यानंतर...

मुहूर्त ठरला, वऱ्हाडी जमले, पण नवरीने ऐनवेळी फिल्मी स्टाईलमध्ये थांबवलं लग्न, मग झाली प्रियकराची एंट्री, त्यानंतर...

Next

उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथून एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे लग्नादिवशीलग्न ठरवलेल्या नवऱ्याच्या गळ्यात वरमाला न घालता प्रियकराच्या गळ्यात माळ घातली. सोशल मीडियावर ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे. लग्न होण्याआधीच मोडले. नवरीने लग्नाचा मुहूर्त जवळ आला असतानाच ऐनवेळी फिल्मी स्टाईलमध्ये नवऱ्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. कुटुंबीयांनी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र मात्र ती तयार झाली नाही. अखेरीस वधूविनाच नवरा आणि वरात माघारी परतली. त्यानंतर वधूने घरी जाण्याऐवजी त्याच ठिकाणी प्रियकराच्या गळ्यात वरमाळा घालून त्याच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.

प्रयागराजमधील एका तरुणीचं लग्न याच भागात असलेल्या काजीपूर येथील तरुणासोबत ठरलं होतं. ५ फेब्रुवारी रोजी टिळा लावण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर ८ तारखेला मेवालाल बाग येथील एका गेस्ट हाऊसमध्ये लग्न होणार होतं. त्यासाठी वऱ्हाडी मंडळी वाजतगाजत आले. मुहूर्त जवळ आला. विधी सुरू झाले. रात्री १.३० वाजता लग्न लागणार होता.  मात्र ऐन वेळी नवरीने लग्न करण्यास नकार दिला. तिने आपल्याला लग्न करायचे नसल्याचे भटजींना सांगितले. नवरीच्या या पावित्र्यामुळे मंडपात एकच गोंधळ सुरू झाला. समजावण्या, विनवण्या झाल्या मात्र नवरी आपल्या निर्णयावर ठाम होती.

या प्रकारामुळे नवऱ्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला. प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. मात्र दोन्ही पक्ष परस्पर सहमतीने लग्न थांबवण्यास तयार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. तरुणी सज्ञान असल्याने तिच्या इच्छेविरुद्ध लग्न होऊ शकत नाही, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणी पोलीस ठाण्यात कुठलीही तक्रार देण्यात आलेली नाही. 
 

Web Title: The time was fixed, the bride and groom gathered, but the bride stopped the wedding just in time in a filmy style, then the boyfriend entered, after that...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.