ट्रॅकवरून रेल्वे इंजिन पोहोचले थेट शेतात, घटनेचा व्हिडीओ आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 03:20 PM2024-09-15T15:20:21+5:302024-09-15T15:20:44+5:30

Train Engine : एक व्हिडीओ समोर आला आहे. रेल्वे रुळावरून पुढे जात असलेले ट्रेनचे इंजिन थेट शेतात जाऊन पोहोचले. यावेळी रेल्वे कर्मचारी ट्रेनच्या इंजिनच्या दिशेने धावताना दिसत आहे. 

The train engine reached the farm directly from the track, the video of the incident came to the fore | ट्रॅकवरून रेल्वे इंजिन पोहोचले थेट शेतात, घटनेचा व्हिडीओ आला समोर

ट्रॅकवरून रेल्वे इंजिन पोहोचले थेट शेतात, घटनेचा व्हिडीओ आला समोर

Train engine derailment gaya : रेल्वे अपघाताच्या घटना चर्चेत असताना बिहारमध्ये ट्रेनचे इंजिन रेल्वे रुळावरून थेट शेतात जाऊन पोहोचल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शुक्रवारी (१३ सप्टेंबर) दुपारी ही घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. 

बिहारमधील गया जिल्ह्यात ही घटना घडली आहे. रेल्वे इंजिन नियंत्रण सुटल्याने लूप लाईन ओलांडून पुढे निघून गेले. 

मिळालेल्या माहितीनुसार, गया-किऊल रेल्वे मार्गावर असलेल्या वजिरगंज रेल्वे स्थानक आणि कोल्हाना थांब्याच्या दरम्यान ही घटना घडली. शुक्रवारी (१३ सप्टेंबर) रघुनाथपूर गावाजवळ रेल्वे इंजिन रेल्वे रूळावर पुढे जात असताना लूप लाईन क्रॉस करून शेतात घुसले. 

गया जंक्शनकडे जात असताना घडली घटना

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, लोको पायलट इंजिन लूप लाईनवरून गया जंक्शनच्या दिशेने घेऊ जात होता. त्याचवेळी इंजिनवरील नियंत्रण सुटले. इंजिन शेतात जात असताना आजूबाजूला असलेल्या लोकांनी याचा व्हिडीओ शूट केला. 

गेल्या महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्ये गया जिल्ह्यात कोळसा घेऊन जाणारी एक रेल्वे गाडी रुळावरून घसल्याची घटना घडली होती. मालगाडीचे आठ डब्बे रुळावरून घसरले होते. यात कोणतेही नुकसान झाले नाही. 

Web Title: The train engine reached the farm directly from the track, the video of the incident came to the fore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.