पाेटात घुसली गाेळी, तरीही वाचविले प्रवाशांचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 05:40 IST2024-12-08T05:40:15+5:302024-12-08T05:40:26+5:30
जीप चालकाचे सर्वत्र काैतुक

पाेटात घुसली गाेळी, तरीही वाचविले प्रवाशांचे प्राण
पाटणा : साखरपुडा उरकून परतणाऱ्यांच्या वाहनावर हल्ला झाल्यानंतर जीपचालकाच्या पाेटात गाेळी लागली. मात्र, त्याने माेठे धाडस दाखवून काही किलाेमीटर अंतरापर्यंत तशाच अवस्थेत गाडी चालविली आणि गाडीतील लाेकांना एका सुरक्षित ठिकाणी नेले. ही घटना बिहारच्या भाेजपूर जिल्ह्यातील असून संताेष सिंह नावाच्या चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या शाैर्याचे परिसरात काैतुक करण्यात येत आहे.
जीपमध्ये १४ ते १५ जण हाेते. ते साखरपुडा उरकून गुरुवारी परतत हाेते. त्यावेळी मध्यरात्री माेटरसायकलवरुन आलेल्या दाेघांनी गाडीवर गाेळीबार केला. एक गाेळी संताेष यांच्या पाेटाला लागली. मात्र, धाेका ओळखून त्यांनी गाडी थांबविली नाही. वेग वाढवून गाडी हल्लेखाेरांपासून दूर नेली. काही किलाेमीटर अंतरावर सुरक्षित ठिकाण पाहून त्याने गाडी थांबविली. त्यानंतर जीपमधील लाेकांनी याबाबत पाेलिसांना माहिती दिली. (वृत्तसंस्था)
हल्लेखाेरांचा शाेध सुरू
nपाेलिसांनी सांगितले की, हल्लेखाेरांनी त्या दिवशी आणखी एका गाडीवर हल्ला करुन त्यातील लाेकांना लुटले हाेते.
nलाेकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे स्केच तयार करण्यात आले असून हल्लेखाेरांचा शाेध सुरू आहे.
शस्त्रक्रिया करून गाेळी काढली
पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्वप्रथमच संताेष सिंह यांना आरा येथील एका रुग्णालयात दाखल केले. तेथे शस्त्रक्रिया करून गाेळी काढण्यात आली. त्यांची प्रकृती धाेक्याबाहेर आहे.