VIDEO: सणासुदीच्या गर्दीमुळं ट्रेन सुटली, प्रवाशानं तिकिटाचा संपूर्ण परतावा मागीतला! काय सांगतो रेल्वेचा नियम? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 01:40 PM2023-11-12T13:40:23+5:302023-11-12T13:42:27+5:30
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अनेक व्हिडिओंमध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी आणि खचाखच भरलेल्या गाड्या दिसत आहेत. या गर्दीमुळे अनेक प्रवासी अडकून पडले असून त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचणेही कठीण होत आहे.
सूरत - सणासुदीची गर्दी हाताळण्यात अथवा तिचे व्यवस्थापन करण्यात आलेल्या अपयशामुळे भारतीय रेल्वेला पुन्हा एकदा टीकांचा सामना करावा लागत आहे. कारण दिवाळीसाठी घरी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अनेक व्हिडिओंमध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी आणि खचाखच भरलेल्या गाड्या दिसत आहेत. या गर्दीमुळे अनेक प्रवासी अडकून पडले असून त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचणेही कठीण होत आहे.
एका प्रवाशाने X वर (आधीचे ट्विटर) एक व्हिडिओ शेअर करत, आपण कन्फर्म तिकीट विकत घेतले होते. मात्र सणासुदीच्या गर्दीमुळे आपल्याला ट्रेनमध्ये प्रवेश करता आला नाही, यामुळे आपली ट्रेन सुटली, असा दावा या प्रवाशाने केला आहे. एवढेच नाही, तर आपल्या सारख्या अनेक लोकांना ट्रेनमध्ये प्रवेशच करता आला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
संबंधित प्रवाशाने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर (DRM) वडोदरा यांना टॅग करत लहिले आहे, ‘भारतीय रेल्वेचे व्यवस्थापन अत्यंत खराब आहे. माझी दिवाळी बर्बाद केल्याबद्दल धन्यवाद. थर्ड एसीचे कन्फर्म तिकीट असले तरी आपल्याला हेच मिळते. पोलिसांकडूनही सहकार्य मिळाले नाही. माझ्या सारख्या अनेक प्रवाशांना रेल्वेत बसता आले नाही. माला एकूण 1173.95 रुपयांचा परतावा हवा आहे.’
याशिवाय, "कामगार लोकांच्या गर्दीने मला ट्रेनमधून बाहेर ढकलले, दरवाजे बंद केले आणि कुणालाही ट्रेनमध्ये जाऊ दिले नाही. एवढेच नाही, तर पोलिसांनीही मला मदत करण्यास नकार दिला आणि परिस्थितीवर हसू लागले," असेही संबंधित प्रवाशाने म्हटले आहे. याच बरोबर, DRM वडोदराने सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त करत, रेल्वे पुलिसांकडे घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
PNR 8900276502
— Anshul Sharma (@whoisanshul) November 11, 2023
Indian Railways Worst management
Thanks for ruining my Diwali. This is what you get even when you have a confirmed 3rd AC ticket. No help from Police. Many people like me were not able to board. @AshwiniVaishnaw
I want a total refund of ₹1173.95 @DRMBRCWRpic.twitter.com/O3aWrRqDkq
काय सांगतो नियम -
ट्रेन सुटल्यास आपण आपल्या रिफंडसाठी क्लेम करू शकता. रेल्वेच्या नियमानुसार, जर एखाद्या प्रवाशाची रेल्वे सुटली अथवा 3 तासांहून अधिक लेट झाली, तर आपण तिकट कॅन्सल करून रिफंडसाठी क्लेम करू शकतात. मात्र हा रिफंड मिळविण्यासाठी आपल्याला रेल्वेच्या काही अटी पूर्ण कराव्या लागतील. याशिवाय आपल्याला रिफंड मिळणार नाही. अशा स्थितीत प्रवाशांना टीडीआर फाइल करून रिफंड मिळवता येऊ शकतो.