गिझरचा स्फोट होऊन नवविवाहित डॉक्टर जोडप्याचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबावर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 10:34 AM2022-10-21T10:34:44+5:302022-10-21T10:35:05+5:30

घटनेची माहिती मिळताच पाच मिनिटांत नाईट ड्युटी ऑफिसर एस श्रुती, पोलिस निरीक्षक के श्रीनिवास आणि अतिरिक्त पोलिस निरीक्षक मुजीब उर रहमानी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना घराच्या बाथरूममध्ये पती-पत्नी मृतावस्थेत आढळले

The unfortunate death of a newly married doctor couple due to a geyser explosion in Hyderabad | गिझरचा स्फोट होऊन नवविवाहित डॉक्टर जोडप्याचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबावर शोककळा

गिझरचा स्फोट होऊन नवविवाहित डॉक्टर जोडप्याचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबावर शोककळा

googlenewsNext

हैदराबाद - गुरुवारी रात्री उशिरा हैदराबादमधील लंगर हौज येथील खादरबागमधील एका घरात शॉर्टसर्किटमुळे गीझरचा स्फोट झाला. या भीषण अपघातात नवविवाहित जोडप्याचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासात शॉर्टसर्किटमुळे अपघात झाल्याचा अंदाज आहे. रात्री ९.३० वाजता पोलिसांना या प्रकरणाची माहिती स्थानिकांकडून मिळाली.

पती-पत्नी बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळले
घटनेची माहिती मिळताच पाच मिनिटांत नाईट ड्युटी ऑफिसर एस श्रुती, पोलिस निरीक्षक के श्रीनिवास आणि अतिरिक्त पोलिस निरीक्षक मुजीब उर रहमानी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना घराच्या बाथरूममध्ये पती-पत्नी मृतावस्थेत आढळले. २६ वर्षीय डॉक्टर निसारुद्दीन आणि २२ वर्षीय एमबीबीएस विद्यार्थी आणि निसरुद्दीनची पत्नी उम्मी मोहिमीन सायमा यांचा जागीच मृत्यू झाला होता. नाईट ड्युटी ऑफिसरने तात्काळ मृत व्यक्तींचे मृतदेह तपासणीच्या उद्देशाने शवागारात जतन करण्यासाठी उस्मानिया सामान्य रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था केली.

यापूर्वीही गिझरमुळे मृत्यू 
या वर्षीच्या सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यात नाशिकच्या जेलरोड परिसरात साक्षी जाधवचाही बाथरूममध्ये मृत्यू झाला होता, बाथरूममध्ये आंघोळ करताना गॅस गिझर चालवताना तिचा गुदमरून मृत्यू झाला होता. साक्षी आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली होती. बराच वेळ होऊनही ती बाहेर न आल्याने घरच्यांनी बाथरूमचा दरवाजा तोडला असता ती बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. त्यावेळी बाथरूममध्ये गॅसचा वास येत होता. तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिथे डॉक्टरांकडून साक्षीला मृत घोषित करण्यात आले. जाधव कुटुंबातील साक्षी ही एकुलती एक मुलगी होती.

गीझर धोकादायक का आहेत?
सहसा घरातील लोकांच्या स्वयंपाकघरात आणि बाथरूममध्ये इलेक्ट्रिक गिझर असतात. पण अनेकदा लोक हिवाळ्यातही हे गिझर चालू ठेवतात. आता गिझर सतत चालू असल्याने त्यात गळतीची समस्या निर्माण झाली आहे. तसेच गीझर जास्त वेळ चालू ठेवल्याने त्याच्या बॉयलरवर खूप दबाव येतो. गरम पाण्याचा दाब बॉयलरमध्ये गळतो. अशा परिस्थितीत हा बॉयलर तांब्याचा नसेल तर त्याचा स्फोट होतो. बॉयलरचा स्फोट होऊन किती नुकसान होऊ शकते हे सांगता येत नाही, पण जर बॉयलर फुटला किंवा गळती झाली तर त्याचा करंट तुमचा जीव घेऊ शकतो हे मात्र नक्की. गिझरच्या पाण्याने आंघोळ करतानाही असे होऊ शकते. याशिवाय गॅस गिझरचीही मोठी समस्या आहे. गॅस गीझर कार्बन डायऑक्साइडऐवजी कार्बन मोनोऑक्साइड तयार करतात, ज्यामुळे चक्कर येणे, बेशुध्द किंवा गुदमरणे होऊ शकते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: The unfortunate death of a newly married doctor couple due to a geyser explosion in Hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.