‘वरात, मंडप सारं तयार, पण नवरदेवाचा पत्ताच नाही’’, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावरून आपची खोचक टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 15:10 IST2025-02-18T15:09:55+5:302025-02-18T15:10:40+5:30

Delhi New Chief Minister: मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला नसतानाही भाजपाकडून दिल्लीतील प्रसिद्ध रामलीला मैदानामध्ये शपथिविधीची तयारी करण्यात येत आहे. त्यावरून आम आदमी पक्षाने भाजपावर खोचक टीका केली आहे. वरात, मंडप सगळं काही तयार आहे. पण नवरदेवाचा पत्ताच नाही, असा टोला आपचे दिल्लीमधील प्रदेश संयोजक गोपाल राय यांनी लगावला आहे.

"The wedding, the pavilion are all ready, but the groom is nowhere to be found," AAP's scathing criticism of Delhi's Chief Ministership | ‘वरात, मंडप सारं तयार, पण नवरदेवाचा पत्ताच नाही’’, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावरून आपची खोचक टीका 

‘वरात, मंडप सारं तयार, पण नवरदेवाचा पत्ताच नाही’’, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावरून आपची खोचक टीका 

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दोन आठवडे उलटत आले तरी राज्यात नवं सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. दिल्लीत आम आदमी पक्षाचा पराभव करत स्पष्ट बहुमतासह सत्ता मिळवल्यानंतरही भाजपालाआपला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निश्चित करता आलेला नाही. असं असतानाही भाजपाकडून दिल्लीतील प्रसिद्ध रामलीला मैदानामध्ये शपथिविधीची तयारी करण्यात येत आहे. त्यावरून आम आदमी पक्षाने भाजपावर खोचक टीका केली आहे. वरात, मंडप सगळं काही तयार आहे. पण नवरदेवाचा पत्ताच नाही, असा टोला आपचे दिल्लीमधील प्रदेश संयोजक गोपाल राय यांनी लगावला आहे.

दिल्लामध्ये मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठी भाजपाला होत असलेल्या उशिरावरून टीका करताना गोपाल राय म्हणाले की, भारताच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडत आहे. वरात तयार आहे. मंडपही तयार आहे. मात्र नवरदेव कोण असेल हेच भाजपाला ठरवता येत नाही आहे.

गोपाल राय पुढे म्हणाले की, भाजपा सारं काही करत आहे. मात्र त्यांना मुख्यमंत्री ठरवता येत नाही आहे. आतापर्यंत भाजपाने आपल्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावलेली नाही. हे भाजपावाले पुढच्या पाच वर्षांत आणखी काही विक्रम रचतील. भाजपा अंतर्गत चढाओढ लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहे. आता दिल्लीच्या जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता भाजपाने केली पाहिजेत, असा टोलाही गोपाल राय यांनी लगावला.

दरम्यान, दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान झालं होतं. तर ८ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर झाले होते. त्यामध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवताना ४८ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं होतं. तर मागच्या दहा वर्षांपासून दिल्लीच्या सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाला केवळ २२ जागांवर समाधान मानावं लागलं होतं.   

Web Title: "The wedding, the pavilion are all ready, but the groom is nowhere to be found," AAP's scathing criticism of Delhi's Chief Ministership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.