पत्नीने दाताने तोडला पतीच्या जिभेचा लचका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 06:47 IST2023-01-30T06:46:34+5:302023-01-30T06:47:15+5:30
Crime News: हरियाणातील हिसार जिल्ह्यात पत्नीने पतीच्या जिभेचा दाताने लचका तोडला. एवढेच नव्हे तर त्याच्या डोक्यावर काठीने वार करून जखमी केले.

पत्नीने दाताने तोडला पतीच्या जिभेचा लचका
चंडीगड : हरियाणातील हिसार जिल्ह्यात पत्नीने पतीच्या जिभेचा दाताने लचका तोडला. एवढेच नव्हे तर त्याच्या डोक्यावर काठीने वार करून जखमी केले. यावेळी पत्नी सरस्वतीने पती करमचंदच्या कुटुंबीयांना शिवीगाळही केली. करमचंद याच्या जिभेवर १५ टाके पडले आहेत.
बरवाला पोलिसांनी सरस्वतीविरुद्ध गुन्हा दाखल आहे. मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे आणि अपशब्द वापरणे अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे तपास अधिकारी दयाराम यांनी सांगितले. करमचंद आणि सरस्वती यांचा दहा वर्षांपूर्वी विवाह झाला. सरस्वतीचे गेल्या काही दिवसांपासून करमचंदशी भांडण होत होते. लग्नापासून ती भांडणे करीत होती. करमचंदचे वडील मायाचंद यांनी म्हटले आहे की, रात्री अचानक माझ्या मुलाचा रडण्याचा आवाज आल्याने मी त्याच्या खोलीत गेलो. तेथे मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला बोलताही येत नव्हते. त्याने एका कागदावर लिहिले की पत्नीने दाताने आपल्या जिभेला चावा घेतला आहे. त्याला १५ टाके पडले, पण तरीही तो बोलू
शकत नाही.