आयएएस अधिकाऱ्याने सर्व मर्यादा ओलांडल्या; विद्यार्थीनीच्या मोफत सॅनिटरी पॅडच्या मागणीवर कंडोमचे उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 07:31 PM2022-09-28T19:31:07+5:302022-09-28T19:31:45+5:30

सरकार २०-३० रुपयांचे सॅनिटरी पॅड महिलांना, मुलींनी मोफत देऊ शकत नाही का? असा सवाल एका विद्यार्थीनीने या आयएएस अधिकाऱ्याला केला होता.

The Women Bihar IAS officer harjot kaur crossed all limits; free Condom's response to student's demand for free sanitary pads... | आयएएस अधिकाऱ्याने सर्व मर्यादा ओलांडल्या; विद्यार्थीनीच्या मोफत सॅनिटरी पॅडच्या मागणीवर कंडोमचे उत्तर...

आयएएस अधिकाऱ्याने सर्व मर्यादा ओलांडल्या; विद्यार्थीनीच्या मोफत सॅनिटरी पॅडच्या मागणीवर कंडोमचे उत्तर...

Next

पटना : बिहारमध्ये एक धक्कादायक तेवढाच घृणास्पद प्रकार समोर आला आहे. एका महिला आयएएस अधिकाऱ्याने सर्वांसमोर विद्यार्थीनीशी वाईट वर्तन केले आहे. या विद्यार्थीनीने महिलांच्या समस्यांवरील एका कार्यक्रमात सरकारने सॅनिटरी पॅड मोफत देण्याची मागणी केली होती. 

सरकार २०-३० रुपयांचे सॅनिटरी पॅड महिलांना, मुलींनी मोफत देऊ शकत नाही का? असा सवाल एका विद्यार्थीनीने या आयएएस अधिकाऱ्याला केला होता. यावेळी या महिला अधिकाऱ्याने सर्व मर्यादा तोडल्या व मग उद्या कंडोमपण मोफत द्यावे लागतील असे उत्तर दिले आहे. 

सॅनिटरी पॅडच काय, उद्या जीन्स पँटही देऊ शकतो, परवा चप्पलही का देऊ शकत नाही? एवढेच काय उद्या कुटुंब कल्याणवरून मागणी झाली तर कंडोमही मोफत देऊ शकतो, असे वक्तव्य आयएएस अधिकारी हरजोत कौर यांनी केले आहे. 
महिला आणि बाल विकास महामंडळ, युनिसेफ, सेव्ह द चिल्ड्रन आणि प्लॅन इंटरनॅशनल यांनी 'सशक्त बेटी, समृद्धी बिहार: गर्ल चाइल्डचे मूल्य वाढवण्याच्या दिशेने' या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत विद्यार्थीनीने हा प्रश्न मांडला होता, त्यावर कौर यांनी हे वादग्रस्त उत्तर दिले. 

यापुढे जाऊन कौर यांनी आणखी काही वक्तव्ये केली आहेत. कौर यांच्या या उत्तरावर जनतेच्या मताने सरकार बनते, असे विद्यार्थिनीने म्हटले असता, हा मूर्खपणाचा कळस असल्याचे म्हटले. असे जर तुम्हाला वाटत असेल तर मतदान करू नका, पाकिस्तानात जा, असे वक्तव्य केले. यावर विद्यार्थीनीने मी भारतीय नागरिक आहे मग पाकिस्तानात का जाऊ असे विचारले असता, तुम्ही पैसे आणि सेवा मिळविण्यासाठी मत देता का असा सवाल केला. कौर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Web Title: The Women Bihar IAS officer harjot kaur crossed all limits; free Condom's response to student's demand for free sanitary pads...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.