जिथे भगवान श्रीरामाची मूर्ती असेल, त्या गर्भगृहाच्या कामाला सुरुवात; अयोध्येत योगींनी रचली पहिली वीट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 06:53 AM2022-06-02T06:53:03+5:302022-06-02T06:53:18+5:30
अयोध्येत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रचली पहिली वीट
अयोध्या : अयोध्येत श्रीराम मंदिरात पवित्र गर्भगृहात भूमिपूजन करताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले की, राममंदिराच्या उभारणीसाठीचा हा एक महत्त्वाचा दिवस आहे. कारण, भारताने ५०० वर्षांच्या संघर्षात विजय मिळविला आहे.
माध्यमांशी बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, आता मंदिराचे काम अतिशय वेगाने होईल. मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामाचे मंदिर तयार होण्याचा दिवस आता दूर नाही. देश-विदेशांतील सनातन धर्मांच्या आस्थेचे हे प्रतीक बनेल. भारताच्या एकतेचे हे प्रतीक असेल.
कसे असेल गर्भगृह?
गर्भगृह अष्टकोनी असेल. याच्या भिंती सहा फूट जाडीच्या असतील. त्याच्या बाहेरची बाजू गुलाबी दगडांनी बनविलेली असेल. गर्भगृहात राजस्थानच्या मकराना पर्वतांमधील संगमरवराचाही वापर केला जाणार आहे.