दूधसागर धबधब्यानजीकची दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू, रेल्वे गाड्या रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 04:58 PM2023-07-27T16:58:53+5:302023-07-27T16:59:46+5:30
प्रकाश बेळगोजी बेळगाव : अतिवृष्टीमुळे दूधसागर धबधब्यानजीक बरगंझा घाटात कॅसलरॉक ते कारंझोळ रेल्वे स्थानकादरम्यान दरड कोसळलेली प्रचंड मोठी दरड ...
प्रकाश बेळगोजी
बेळगाव : अतिवृष्टीमुळे दूधसागर धबधब्यानजीक बरगंझा घाटात कॅसलरॉक ते कारंझोळ रेल्वे स्थानकादरम्यान दरड कोसळलेली प्रचंड मोठी दरड हटवण्याचे काम अद्यापही युद्धपातळीवर सुरूच आहे. रेल्वे रुळावरील दगड माती काढण्यात येत असल्यामुळे काही रेल्वे गाड्या अंशतः तर काही पूर्णतः रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती नैऋत्य रेल्वेच्या हुबळी विभागाने दिली आहे.
दरम्यान, आज गुरुवारी सकाळी दक्षिण पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर संजीव किशोर यांनी दरड कोसळलेल्या ठिकाणी पाहणी केली. तसेच लवकरात लवकर दरड बाजूला काढून काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे.
रद्द करण्यात आलेल्या रेल्वे गाड्या -
रेल्वे क्र. 17309 यशवंतपुर - वास्को-द-गामा डेली एक्सप्रेस 29 जुलै 2023 पर्यंत रद्द.
रेल्वे क्र. 17310 वास्को-द-गामा - यशवंतपुर डेली एक्सप्रेस 29 जुलै 2023 पर्यंत रद्द.
अंशतः रद्द रेल्वे गाड्या :
रेल्वे क्र. 18047 शालीमार - वास्को-द-गामा अमरावती एक्सप्रेस आज, शालिमार येथून सुटेल आणि एसएसएस हुबळी - वास्को-द-गामा दरम्यान अंशतः रद्द केली जाईल आणि अल्पावधीसाठी ती एसएसएस हुबळी येथे थांबविण्यात येईल.
रेल्वे क्र. 18048 वास्को-द-गामा - शालीमार अमरावती एक्सप्रेस 30 जुलै रोजी एसएसएस हुबळी - वास्को-द-गामा दरम्यान अंशतः रद्द केली जाईल आणि अल्पावधीसाठी ती वास्को द गामा ऐवजी एसएसएस हुबळी येथून सुटेल.
रेल्वे क्र. 17603/18047 या काचीगुडा - वास्को-द-गामा रेल्वेच्या स्लीप कोचिस उद्या, शुक्रवारी एसएसएस हुबळी - वास्को-द-गामा दरम्यान अंशतः रद्द केल्या जातील आणि अल्पावधीसाठी त्या एसएसएस हुबळी येथे थांबतील.
रेल्वे क्र. 17604/18048 या वास्को-द-गामा - काचीगुडा रेल्वेच्या स्लीप कोचिस उद्या, शुक्रवारी वास्को-द-गामा - एसएसएस हुबळी दरम्यान अंशतः रद्द केल्या जातील आणि अल्पावधीसाठी त्या वास्को द गामा ऐवजी एसएसएस हुबळी येथून सुरू होतील.