पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात जग एकवटले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 07:09 AM2023-09-10T07:09:06+5:302023-09-10T07:09:22+5:30

मोदी म्हणाले, लोकशाहीची जननी या नात्याने संवाद व लोकशाहीवादी विचारांवर आमचा अनंत काळापासून विश्वास आहे

The world is united under the leadership of Prime Minister Modi | पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात जग एकवटले

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात जग एकवटले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आज जी-२०मध्ये जवळपास अर्धे जग एकवटले होते. त्यावेळी त्यांनी सर्वांना आशेचा नवा किरण दाखवत भारत कोणत्या मार्गाने विकास करत आहे, याची काही उदाहरणे दिली. भारत ही श्रद्धा, अध्यात्म व परंपरांच्या विविधतेची भूमी असून, जगातील अनेक मोठ्या धर्मांनी येथे जन्म घेतला आहे; तसेच जगातील प्रत्येक धर्माला येथे सन्मान मिळाला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी जी-२० शिखर परिषदेत शनिवारी केले. 

मोदी म्हणाले, लोकशाहीची जननी या नात्याने संवाद व लोकशाहीवादी विचारांवर आमचा अनंत काळापासून विश्वास आहे. आमचा जागतिक व्यवहार ‘वसुधैव कुटुम्बकम’ म्हणजेच ‘संपूर्ण जग एक कुटुंब’ या भावनेवर आधारित आहे. हीच भावना प्रत्येकास ‘वन अर्थ’च्या बांधिलकीने जोडते. 

नैसर्गिक शेतीवर भर
भारतातील कोट्यवधी शेतकरी आता ‘नैसर्गिक शेती’ करत आहेत. मानवी आरोग्यासह माती आणि पृथ्वीचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठीचे हे मोठे अभियान आहे. आम्ही ‘हरित हायड्रोजन’ उत्पादनासाठी ‘राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियान’ सुरू केले. 

ते वचन पूर्ण करा...
विकसित देशांनी २०२३ मध्ये ‘पर्यावरण भांडवल’ म्हणून १०० अब्ज डॉलरचे वचन पूर्ण करावे. पर्यावरण सुरक्षेसाठी ‘कार्बन क्रेडिट’वर चर्चा सुरू आहे. ती ‘काय करू नये’ अशी आहे. जी-२० देशांनी एका ‘ग्रीन क्रेडिट पुढाकारा’वर काम सुरू करायला हवे.

चंद्रयानाचा उल्लेख
भारताच्या सफल चंद्रयान मोहिमेद्वारे उपलब्ध होणारा डेटा संपूर्ण मानवजातीसाठी उपयुक्त ठरेल. त्यासाठीच भारत ‘जी-२० सॅटेलाइट मिशन फॉर एन्व्हायर्नमेंट अँड क्लायमेट ऑब्झर्वेशन’ सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवत आहे. 

आफ्रिकन युनियन जी-२०चा नवा स्थायी सदस्य, आता ‘जी-२१’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आफ्रिकन युनियनला जी-२० चे स्थायी सदस्यत्व देण्याचा प्रस्ताव मांडला. सर्व सदस्यांच्या सहमतीने ५५ देशांचा गट असलेल्या आफ्रिकन युनियनच्या जी-२० मध्ये समावेशाची घोषणा केली. त्यानंतर आफ्रिकन युनियनचे अध्यक्ष अजाली असौमानी सदस्य म्हणून आसनस्थ झाले. त्यामुळे जी-२० गट आता जी-२१ झाला आहे.

Web Title: The world is united under the leadership of Prime Minister Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.