तरुणीला दुचाकीच्या टाकीवर बसवून स्टंटबाजी करत होता तरुण, तेवढ्यात घडलं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 07:08 PM2023-10-27T19:08:01+5:302023-10-27T19:08:32+5:30
Chhattisgarh: छत्तीसगडमधील भिलाई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका लैला-मजनूच्या जोडीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात ते रात्रीच्या वेळी भरधाव दुचाकीवर स्टंटबाजी करताना दिसत आहेत.
छत्तीसगडमधील भिलाई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका लैला-मजनूच्या जोडीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात ते रात्रीच्या वेळी भरधाव दुचाकीवर स्टंटबाजी करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ भिलाई येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हिडीओमध्ये तरुण एका तरुणीला बाईकच्या टाकीवर उटल्या दिशेने बसवून भरधाव वेगाने बाईक चालवताना दिसत आहे.
सदर तरुणी ही दुचाकीवर तरुणाला चिकटून बसली असल्याचं दिसत आहे. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा प्रकार जेव्हा पोलिसांच्या नजरेत आला. तेव्हा त्यांनी याची दखल घेत या दोघांवरही कारवाई केली आहे.
भिलाई टाऊनशिपमध्ये एक तरुण फिल्मी स्टाईलमध्ये तरुणीला दुचाकीवर बसवून जात होता. त्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर वाहतूक पोलिसांनी पोलिसांनी त्वरित पावलं उचलत या तरुणावर कारवाई केली आणि ४ हजार रुपये दंड वसूल केला. ट्रॅफिक डीएसपी सतीश ठाकूर यांनी सांगितलं की, एक दुचाकी सीजी ०७ बीझेड ८७१६ वरून एक तरुण सेंट्रल एव्हेन्यूच्या रस्त्यावर एका तरुणीला चुकीच्या पद्धतीने बसवून गाडी चालवत होता. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि पोलिसांपर्यंत पोहोचला.
त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत दुचाकीच्या मालकाला नेहरूनगर स्थित कार्यालयात पोहोचवले. तेव्हा त्याने आपण दोन दिवसांपूर्वी दुचाकी दुरुस्तीसाठी दिल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित मेकॅनिकशी संपर्क साधत तरुणाच्या नातेवाईकांना पोलीस ठाण्यात बोलावले आणि त्यांना समज दिली. तसेच ४ हजार रुपये दंडही ठोठावला.