तरुणाकडे नाण्यांचा खजिना; पाहून व्हाल अवाक्! एका ग्रुपमार्फतही करतात खरेदी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 12:32 PM2023-08-22T12:32:24+5:302023-08-22T12:33:28+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील नाण्यांंचाही समावेश
देवास: असं म्हणतात की छंद ही अशी गोष्ट आहे, जी माणसाला कोणतीही गोष्ट करायला भाग पाडते. मध्य प्रदेशमधील देवास शहरातील तरुण व्यापारी विशाल बम (जैन) यांनाही लहानपणापासून जुन्या वस्तू गोळा करण्याची आवड आहे. त्यांच्याकडे प्रत्येक काळातील, साम्राज्यातील आणि संस्थानांची नाणी आहेत.
त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील चलनात आलेली नाणी आहेत. अनेक शिक्क्यांचाही समावेश आहे. एका बाजूला छत्रपती तर दुसऱ्या बाजूला ‘श्रीराजा शिव’ असे लिहिलेले आहे. ही नाणी मराठी कुटुंबात पूजनीय असल्याचे विशाल यांनी सांगितले.
पैसेही करतात खर्च
विशालने सांगितले की, तो देशभरातील अशा लोकांशी संबंधित आहे, जे नाणी आणि इतर जुन्या गोष्टी गोळा करतात. अशा लोकांचा एक ग्रुपही तयार करण्यात आला आहे. विशाल त्यांच्यामार्फतच ही नाणी खरेदी करतो. तो सुमारे चार हजार लोकांच्या संपर्कात आहे. मौल्यवान नाणी विकत घेण्यासाठी पैसाही खर्च करतात.
ही नाणी पूजेत ठेवली जातात. विशाल यांच्याकडे मराठा राज्यकर्त्यांचे तराजू हे चिन्हही आहे. त्यांच्याकडे २०० प्रकारचे १००० बंडल आहेत.ब्रिटिशकालीन १९११ च्या तराजू, चुन्याच्या पेट्या, सुगंधी पेट्या, सरोटे, इंकपॉट्स, चांदीचे खोके, ताड पाने, लाकडी पेन, संस्थानांचे मोनोग्राम, लहान तोफा, सायकल टोकन परवाने यासह इतरही अद्वितीय वस्तुसंग्रह त्यांच्याकडे आहे.
जगातील दुसरे सर्वांत लहान चलन
त्यांच्याकडे २२०० वर्षे जुने, जगातील दुसरे सर्वांत लहान आणि भारताचे पहिले चलनही आहे. वेगवेगळ्या कालखंडातील ही नाणी अखंड भारतातील राजवंश, राजेशाही आणि १ हजार वर्षांपूर्वीची आहेत.
- २,६०० वर्षे जुनी नाणी त्यांच्याकडे चंद्रगुप्त काळातील
- २३०० वर्षे जुनी मौर्य काळातील नाणी
- कुशाण, शुंग, इंडोसेशन काळातील नाणी आणि स्वराष्ट्र जनपद काळातील नाणी आहेत.चोल वंशाची, हिंदुशाही संस्थानाची नाणीही आहेत.