थिएटर आॅलिम्पियाड : सिडनीकर कलाकारांची दिल्लीत मोहोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 01:42 AM2018-02-15T01:42:11+5:302018-02-15T01:42:28+5:30
आॅस्ट्रेलिया, सिडनीतून मराठी नाट्य कलाकारांचा चमू दिल्लीत येत आहेत. राष्ट्रीय नाट्य विद्यालय व केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या विद्यमाने भारतात प्रथमच होणाºया ‘थिएटर आॅलिम्पियाड’मध्ये अभिराम भडकमकरलिखित 'सुखांशी भांडतो आम्ही' नाटक हे कलाकार सादर करणार आहेत.
- टेकचंद सोनवणे
नवी दिल्ली : आॅस्ट्रेलिया, सिडनीतून मराठी नाट्य कलाकारांचा चमू दिल्लीत येत आहेत. राष्ट्रीय नाट्य विद्यालय व केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या विद्यमाने भारतात प्रथमच होणाºया ‘थिएटर आॅलिम्पियाड’मध्ये अभिराम भडकमकरलिखित 'सुखांशी भांडतो आम्ही' नाटक हे कलाकार सादर करणार आहेत. आॅलिम्पियाडमध्ये ३0 देश सहभागी झाले असून, त्यांच्या नाटकांचे साडेचारशे प्रयोग होणार आहेत.
आॅलिम्पियाडमध्ये परदेशी नाट्य चमूकडून सादर होणारे 'सुखांशी भांडतो आम्ही' एकमेव मराठी नाटक आहे. येत्या १८ मार्चला इंदौरमध्ये, तर २० मार्चला दिल्लीत त्याचा प्रयोग होईल. मूळचे वसईतील इंजिनीअर व सिडनीत स्थायिक झालेले नेपोलियन आल्मेदा यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. यातील कलाकार आहेत चिन्मय अभ्यंकर, नेपोलियन आल्मेडा, मानसी गोरे, मंदार पाठक, अपूर्वा आठवले, निलिमा बेर्डे. प्रकाश व नेपथ्य आर्शीवाद आठवले, चारूदत्त भडकरमकर व गणेश कगावडे यांचे आहे, तर प्रकाशयोजना आहे मकरंद बिलदिकर यांची. पार्श्वसंगीत नितीन कुंदप, रंगभूषा संजोत डोंगरे व वेशभूषा संजोत समुद्र यांची आहे.
आकाशवाणीचे सिडनी केंद्र
दशकपूर्तीनिमित्त सिडनी आकाशवाणीने २००५ साली अभिराम भडकमकरलिखित, दिग्दर्शित 'आम्ही असू लाडके' चित्रपटाचा शो आयोजित केला होता. भडकमकरांशी चर्चा करण्याची संधी तेव्हा सिडनीकर मराठी लोकांना मिळाली.
शुक्रवार ते रविवार नाटकाची
तालिम व्हायची. काहींना आपल्या शहरांतून पांहाचायला कैक तास लागायचे. तालमीसाठी लागणारे 'प्रॉपर्टी' प्रत्येकजण घरून
आणायचे. हे कलाकार मूळ पुणे, चाळीसगाव, नाशिक, मुंबई, शिरोडा, सिंधुदुर्गचे रहिवासी आहेत.