दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात चोरी

By admin | Published: December 30, 2016 03:10 PM2016-12-30T15:10:16+5:302016-12-30T15:10:16+5:30

दिल्लीत चोरीमारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच आता चक्क चोरट्यांनी दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच कार्यालयावर हात साफ केला आहे.

Theft in Delhi's Deputy Chief Minister's office | दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात चोरी

दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात चोरी

Next
>ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 30 - दिल्लीत चोरीमारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच आता चक्क चोरट्यांनी दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच कार्यालयावर हात साफ केला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या कार्यालयात काल रात्री चोरी झाल्याची माहिती दिल्ली पूर्व विभागाचे पोलीस आयुक्त ओमवीर सिंग यांनी दिली आहे. 
चोरट्यांनी सिसोदिया यांच्या प्रतापगंज येथील कार्यालयात गुरुवारी रात्री प्रवेश करून हात साफ केला. चोरट्यांनी कार्यालयातून दोन संगणकांच्या सीपीयूसह  लेटरहेड आणि अन्य काही कागदपत्रांची चोरी केली आहे. त्याबरोबरच पुरावा मागे राहू नये म्हणून सीसीटीव्हीचा संचही चोरट्यांनी लांबवला. 
( दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना तात्काळ भारतात परतण्याचे आदेश
 
 दिल्ली पोलिसांनी  आज सकाळी घटनास्थळी धाव घेत तपासकामास सुरुवात केली आहे. सीपीयू तसेच कागदपत्रांची चोरी झाल्याने ही चोरी गुप्त माहिती मिळवण्यासाठी राजकीय हेतूने करण्यात आल्याची शंका निर्माण झाली आहे.  

Web Title: Theft in Delhi's Deputy Chief Minister's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.