बाजार समितीच्या यार्डमधून शेतकर्‍याची तूर चोरी

By admin | Published: March 23, 2017 05:19 PM2017-03-23T17:19:16+5:302017-03-23T17:19:16+5:30

तेल्हारा : व्यापार्‍याच्या तुलनेत शासनाच्या नाफेड तूर खरेदीला जास्त भाव मिळेल, या आशेपोटी विक्रीसाठी तूर आणणे शेतकर्‍याला चांगलेच भोवत असून बाजार समितीच्या यार्डमधून भांबेरी येथील शेतकर्‍याचे तीन क˜े तूर चोरीला गेल्याची घटना २० माच रोजी घडली असून बाजार समितीच्या यार्डमधील शेतकर्‍याच्या शेतमालाच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आला आहे.

Theft of the farmer from the yard of the market committee is theft | बाजार समितीच्या यार्डमधून शेतकर्‍याची तूर चोरी

बाजार समितीच्या यार्डमधून शेतकर्‍याची तूर चोरी

Next
ल्हारा : व्यापार्‍याच्या तुलनेत शासनाच्या नाफेड तूर खरेदीला जास्त भाव मिळेल, या आशेपोटी विक्रीसाठी तूर आणणे शेतकर्‍याला चांगलेच भोवत असून बाजार समितीच्या यार्डमधून भांबेरी येथील शेतकर्‍याचे तीन क˜े तूर चोरीला गेल्याची घटना २० माच रोजी घडली असून बाजार समितीच्या यार्डमधील शेतकर्‍याच्या शेतमालाच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आला आहे.
शेतकर्‍याच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, याकरिता शासनाकडून नाफेडद्वारा तुरीची खरेदी ५ हजार ५० रुपये प्रतिक्विंटल या दराने गत दोन महिन्यापासून सुरू आहे. बाजारात व्यापार्‍यांकडून तुरीला ४००० ते ४३०० रुपये प्रतिक्विंटलच्या दराने तुरीची खरेदी सुरू आहे. व्यापार्‍याच्या तुलनेत शासनाच्या तूर खरेदीला जास्त दर असल्याने शेतकर्‍यांनी नाफेडला तूर विकण्यासाठी एकच गर्दी केली आहे. नाफेडला तूर विक्रीसाठी आणल्यानंतर शेतकर्‍यांना बाजार समितीद्वारे प्रवेश पत्रिका भरून घेतल्या जाते. शेतकर्‍यांनी विक्रीसाठी आणलेला माल यार्डमध्ये ठेवल्यानंतर त्या मालाच्या सुरक्षेची ही बाजार समितीची असते. शेतकर्‍यांनी आणलेल्या मला क्रमवारी पद्धतीने मोजल्या जाणे अपेक्षित असते. परंतु शेतकर्‍यांच्या मालाऐवजी व्यापार्‍याच्या मालाचे मोजमाप स्थानिक बाजार समितीमध्ये सुरू असल्याचे अनेक आरोप यापूर्वी ाले आहेत. शेतकर्‍यांच्या माल चोरीला गेल्याचेसुद्धा अनेकांचे म्हणणे आहे. ताुलक्यातील भांबेरी येथील गजानन दिनकर काकड यांनी आपल्या शेतातील उत्पादित तूर २६ फेब्रुवारी २०१७ रोजी नाफेडला विक्रीसाठी तेल्हारा बाजार समितीच्या यार्डमध्ये ३५ नग प्लॉस्टिक बारदान्यामध्ये विक्रीसाठी आणली. बाजार समितीच्या आवक नोंदप्रमाणे टोकन क्रमांक ८७८ त्यांना मिळाला. २० मार्च रोजी सदर शेतकरी बाजार समितीच्या यार्डमध्ये आपला माल पाहण्यासाठी आले असता ३ क˜े तूर गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आहे. त्यांनी लगेच बाजार समितीचे सचिव माधव पाथ्रीकर यांना कळविले. सदर तूर गायब झाल्याचे निवेदन त्यांनी बाजार समितीला दिल्यानंतरसचिव यांनी याउर्मध्ये जाऊन पाहणी केली. बाजार समितीचे यार्डमध्ये नियंत्रण असताना शेतकर्‍याची तूर गायब झाली तरी कशी, असा प्रश्न यानिमिताने समोर येत आहे. सदर घटनेने तूर विक्रीला आणणारे शेतकरी धास्तावले असून ग्रामीण भागातून उन्हातान्हात शेतकरी आपल्या मालाजवळ येऊन दिवसभर बसत आहेत. (शहर प्रतिनिधी)
फोटो

Web Title: Theft of the farmer from the yard of the market committee is theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.