सुपारी चोरीतील आरोपींचा पर्दाफाश
By admin | Published: February 11, 2015 11:19 PM2015-02-11T23:19:47+5:302015-02-11T23:19:47+5:30
सुपारी चोरीतील आरोपींचा पर्दाफाश
Next
स पारी चोरीतील आरोपींचा पर्दाफाशमुद्देमाल जप्त : लकडगंज पोलिसांची कामगिरीनागपूर : हितेंद्र नटवरलाल मेहता यांच्या स्मॉल फॅक्टरी एरियातील गोडाऊनमधून सुपारीच्या पाच लाखाच्या २५ बॅग पळविणाऱ्या टोळीचा लकडगंज पोलिसांनी पर्दाफाश करून आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे लकडगंज पोलिसांनी आरोपी राजकुमार ठाकूराम माणिकपंच (शाहू) (३१) रा. डिप्टी सिग्नल झोपडपट्टी बाजार चौक यास ताब्यात घेतले. त्याच्या माहितीवरून हितेश नानकराम आसवानी (२८) रा. दत्तनगर, एनआयटी गार्डनसमोर, हेमंत रेखराम शाहू (३९) रा. लालगंज गुजरी हनुमान मंदिराजवळ, सुंदरलाल रेखराम शाहू (३२) डिप्टी सिग्नल झोपडपट्टी बाजार चौक, धर्मेंद्र रामजी मेश्राम (२५) डिप्टी सिग्नल झोपडपट्टी बाजार चौक, अमीन रसीद शेख (३१) आदिवासी प्रकाशनगर झोपडपट्टी यांना अटक केली. चौकशीदरम्यान आरोपी धर्मेंद्र रामजी मेश्राम याने दिलेल्या माहितीनुसार गुन्ह्यात वापरलेला ट्रक क्रमांक एमएच ३१, सीबी-४५३५ चा चालक अजय ऊर्फ उगेश बुद्धू पटेल (२८) रा. श्रावणनगर, आटाचक्कीजवळ नंदनवन यास अटक करण्यात आली. गुन्ह्यात एकुण १० लाखाचा माल जप्त करण्यात आला. आरोपी हितेश आसवानी हा इतवारी अनाज बाजारात दलाल असून आरोपी धर्मेंद्र मेश्राम हा फिर्यादीच्या गोडाऊनमध्ये हमालीचे काम करीत होता. धर्मेंद्रने चोरीची टीप आरोपी सुंदरलाल शाहू यांना दिली. त्याने साथीदारांना सोबत घेऊन गोडाऊनमध्ये चोरी केली होती. ही कारवाई पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. के. जयस्वाल, पोलीस निरीक्षक एस. डी. मडावी, सहायक पोलीस निरीक्षक एस डी. निकम, हवालदार अजय रोडे, राजेंद्र बघेल, प्रवीण गाणार, रत्नाकर मेश्राम, मनोज नेवारे, सतीश पांडे, दीपक कारोकर, राजेश डेकाटे, सुबोध खानोरकर यांनी पार पाडली.गरम मसाल्याची चोरीही उघडआरोपी हितेश आसवानी याने लकडगंजमधील गरम मसाल्याच्या दुकानातील चोरीची माहिती दिली. हरिराम कमलेश कुमार यांच्या गरम मसाल्याच्या दुकानात १४ जानेवारीच्या मध्यरात्री चोरी झाली होती. आरोपी हितेशने त्याचे साथीदार विकास रा. गुलशननगर, वसंता हेडाऊ रा. बाराखोली यांच्यासह मारुती ओम्नी गाडीतून १.९० लाखाची विलायची, १.५१ लाखाची लवंग, ११ हजाराची दालचिनी असा २.६९ लाखाचा मुद्देमाल चोरला. गुन्ह्यातील २ लाख रुपये किमतीची मारुती ओम्नी जप्त करण्यात आली आहे.