चोरट्यांचा शाळेतील संगणकांवर डल्ला ला.ना.शाळेत चोरी : पाच लाख रुपये किमतीचे साहित्य लांबविले
By Admin | Published: January 14, 2016 11:59 PM2016-01-14T23:59:51+5:302016-01-14T23:59:51+5:30
जळगाव: शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या ला.ना.शाळेतील रायसोनी व आयसीटी या दोन्ही लॅबचे कडी कोंडे तोडून चोरट्यांनी त्यातील संगणक व त्याचे साहित्य असे पाच लाख रुपयांचे साहित्य लांबविल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला आहे. शाळेच्या मागील बाजुच्या तुटलेल्या खिडकीतून चोरट्यांनी प्रवेश केला आहे.
ज गाव: शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या ला.ना.शाळेतील रायसोनी व आयसीटी या दोन्ही लॅबचे कडी कोंडे तोडून चोरट्यांनी त्यातील संगणक व त्याचे साहित्य असे पाच लाख रुपयांचे साहित्य लांबविल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला आहे. शाळेच्या मागील बाजुच्या तुटलेल्या खिडकीतून चोरट्यांनी प्रवेश केला आहे.गुरुवारी सकाळी सात वाजता लॅब असिस्टंट उमेश पिंगळे हे शाळेत आले असता एका लॅबची कडी उघडी दिसली तर दुसरीचा कडी कोंडा तुटलेला दिसला. कुलूप गायब झालेले होते. त्यांनी हा प्रकार लॅब प्रमुख सचिन देशपांडे यांना कळविला. त्यांनी लागलीच संस्थाध्यक्ष ॲड.सुशील अत्रे यांना हा प्रकार सांगितला. शाळेचे शिक्षक व संस्थेचे संचालक दाखल झाल्यानंतर पोलिसांना ही घटना कळविण्यात आली. पोलीस निरीक्षक शाम तरवाडकर, उपनिरीक्षक गिरधर निकम, गुन्हे शाखेचे राजू मेंढे, अल्ताफ पठाण आदीजण डॉगस्कॉड व फिंगर प्रिंट पथकासह दाखल झाले.स्थानिग गुन्हे शाखेचे पथक यावेळी दाखल झाले. २१ क्रमांकाच्या खोलरतून प्रवेशचोरट्यांनी बागील बाजूस उघड्या खिडकीतून शाळेत प्रवेश मिळविला. २१ क्रमांकाच्या खोलीतून त्यांनी लॅबमध्ये प्रवेश केला. संगणकासाठी लागणारे सर्व साहित्य चोरट्यांनी आणले होते.सीपीयु, हार्डडिस्क स्क्रु, खोलून आवश्यक तोच सामान नेण्यात आला आहे. दोन्ही लॅबमधील काही संगणक मात्र जैसे थे होते.एखाद्या माहितगार व्यक्तीकडूनच हा प्रकार झाल्याचा संशय शिक्षक व पोलिसांना आहे.चाचणीचा डाटा झाला चोरीफेब्रुवारी महिन्यात दहावीच्या विद्यार्थ्यांची कल चाचणी होणार आहे. त्यासाठी लागणारा डाटा या संगणकात फिड करण्यात आला होता.ही चाचणी ऑनलाईन होणार होती. शिक्षकांनी त्याची तयारी केलेली होती, मात्र हा डाटाच चोरी झाल्याने मोठे संकट शिक्षकांवर येऊन ठेपले आहे. शाळेतील अन्य कोणत्याही वर्गात चोरट्यांनी प्रवेश केलेला नाही. असे गेले साहित्यरायसोनी लॅबमॉनिटर्स-१९ कीबोर्ड-०९माऊस-१७सीपीयु केबल -१६पॉवर केबल-१२मॉनिटर स्टॅँड-१०आयसीटी लॅबमॉनिटर्स-०६सीपीयु-०२माऊस-०३प्रिंटर्स ०१रॅम-१३मदरबोर्ड -०२प्रोसेसर-०२लॅन केबल -१ बंडलहार्डीक्स-१०सीडी रायटर-०५