दहशत माजविणा-या त्रिकुटाकडून चोरीचे प्रकारही
By admin | Published: May 15, 2015 11:32 PM2015-05-15T23:32:49+5:302015-05-15T23:32:49+5:30
पुणे : वडारवाडी परिसरात दहशत माजविणा-या त्रिकुटास चतु:श्रुंगी पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांनी शस्त्राचा धाक दाखवित एकास लुबाडल्याचे आणि मोटरसायकलवरुन येऊन सोनसाखळी हिसकाविल्याची माहिती पुढे आहे.
Next
प णे : वडारवाडी परिसरात दहशत माजविणा-या त्रिकुटास चतु:श्रुंगी पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांनी शस्त्राचा धाक दाखवित एकास लुबाडल्याचे आणि मोटरसायकलवरुन येऊन सोनसाखळी हिसकाविल्याची माहिती पुढे आहे. काळू उर्फ श्रीकांत सुनिल पवार (आकाशगंगा सोसायटी समोर, वडारवाडी )हर्शद राजेंद्र देशमुख (चव्हाणनगर, पदमावती) आणि सुनिल गौतम कसबे (वडारवाडी )अशी आरोपींची नावे आहेत. गेल्या महिनाअखेरीस रात्री नऊच्या सुमारास ज्ञानेश्वर पादुका चौकाजवळ आठ ते नऊ जणांनी एका टपरीवर शीतपेय पिणा-यांना अचानक मारहाण केली होती. चाकू, लाठ्या, लोखंडी चेन हाती असलेल्या या टोळक्याने वडारवाडीत वाहनांचेही नुकसान केले होते.वरिष्ठ पोलीस निरिक्षक अरुण सावंत यांच्या सुचनेनुसार फौजदार राजाराम चौहान, तुषार पाचपुते यांनी या आरोपींचा शोध सुरु केला. हे सर्व आरोपी वडारवाडीत येणार असल्याचे समजल्यावर अकरा तारखेला पहाटे तीनच्या सुमारास हवालदार बाळू गायकवाड, नाईक शरद पाटील, संजय वाघ, संजय शिंदे, शिपाई चेतन गोरे, श्रीनाथ जाधव, विजय मोरे, प्रवीण पाटील यांनी सापळा रचून त्यांना पकडले.गेल्या ऑगस्ट मध्ये त्यांंनी रात्री पाऊणच्या सुमारास पुलाखाली शक्तिकुमार पाटील (बाणेर)यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील साठ हजारांची सोनसाखळी व दहा हजारांची रोकड काढून घेतली होती. तसेच डिसेंबरमध्ये गणेशखिंड रस्त्यावर मोटरसायकलवरुन येऊन एकाची पन्नास ग्रॅम सोनसाखळी हिसकाविली होती.या दोन्ही गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली असून साठ हजारांची सोनसाखळी जप्त करण्यात आली आहे. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून मुख्य सूत्रधार काळू उर्फ श्रीकांत सुनिल पवार हा मोक्का अंतर्गत कारवाई केलेल्या गुन्हेगाराचा भाचा आहे. त्याच्यावर चोरी, हाणामारी असे गुन्हे दाखल आहेत.