चोरी करणार्या महिलांच्या कोठडीत पुन्हा वाढ
By admin | Published: February 21, 2016 12:31 AM2016-02-21T00:31:58+5:302016-02-21T00:31:58+5:30
जळगाव : महाबळ परिसरातील नूतन वर्षा कॉलनीत घरफोडी करून दीड लाख रुपये किंमतीचे दागिने व इतर मुद्देमाल लांबवणार्या महिलांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना शनिवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत पुन्हा एका दिवसाने वाढ केली.
Next
ज गाव : महाबळ परिसरातील नूतन वर्षा कॉलनीत घरफोडी करून दीड लाख रुपये किंमतीचे दागिने व इतर मुद्देमाल लांबवणार्या महिलांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना शनिवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत पुन्हा एका दिवसाने वाढ केली.संशयित आरोपी कल्पना धनराज हातागडे (२१, रा.राजीव गांधीनगर), रंजना सुरेश रणसिंग (३५, रा.हरिविठ्ठलनगर), रचना अनिल खलसे (२२, रा.तडवी गल्ली, हरिविठ्ठलनगर), लताबाई सदाशिव खंडारे (४५, रा.तडवी गल्ली, हरिविठ्ठलनगर) व जमुनाबाई गोरख कांबळे (३०, रा.राजीव गांधीनगर) अशी त्या महिलांची नावे आहेत. त्यांना १३ रोजी अटक झाली आहे. सरकारतर्फे ॲड.राजेश गवई तर आरोपींकडून ॲड.अजय सिसोदिया काम पाहत आहेत.