त्यांची सप्तपदी आंबेडकरांच्या पुतळ्याभोवती
By admin | Published: July 5, 2017 04:11 PM2017-07-05T16:11:46+5:302017-07-05T16:18:25+5:30
या जोडप्याने कोणताही विवाहसोहळा आयोजित न करता फक्त महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धाच्या पुतळ्याला फे-या घेऊन लग्नगाठ बांधली
Next
ऑनलाइन लोकमत
सिहोर, दि. 5 - लग्न म्हटलं की सर्वात आधी डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे अवाढव्य खर्च. अनेकदा समाजातील प्रतिष्ठा जपण्यासाठी आपली ऐपत नसतानाही लोक लाखो रुपये खर्च करुन लग्नसोहळा आयोजित करतात. कित्येकदा तर कर्ज काढून लग्न केलं जातं. मात्र मध्यप्रदेशातील एका जोडप्याने कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साधेपणाने लग्न केलं आहे. आपली आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने या जोडप्याने कोणताही विवाहसोहळा आयोजित न करता फक्त महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धाच्या पुतळ्याला फे-या घेऊन लग्नगाठ बांधली. मध्य प्रदेशातील सिहोरमधील ही घटना आहे.
आणखी वाचा -
आर्थिक बाजू भक्कम नसल्याने कल्लू जाटव आणि वैजंती राजोरिया या जोडप्याने लग्नाचा खर्च वाचवण्यासाठी हा स्तुत्य निर्णय घेतला. दोघेही डॉ. आंबेडकर पार्कमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांच्या पुतळ्याला फेऱ्या घेऊन विवाहाबंधनात अडकले. लग्नासाठी पारंपारिक कपड्यांमध्ये उपस्थित असलेल्या कल्लू जाटव आणि वैजंती राजोरियाने बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर एकमेकांना हारदेखील घातला.
नवरदेव कल्लूने दावा केला आहे की, त्याने लग्नासाठी मुख्यमंत्री कन्यादान योजनेअंतर्गत मदत मागितली होती. मात्र कोणत्याही प्रकारची मदत आपल्याला मिळाली नाही. यानंतर त्याने काही सामाजिक संस्था आणि लोकांची मदत घेत अत्यंत साध्या पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. घेतलेल्या निर्णयाची अंमलबजाणी करत दोघांनी अत्यंत कमी खर्चात लग्न केलं.
या लग्नाच सामील झालेले सामाजिक कार्यकर्ता नरेंद्र खंगराले यांनी सांगितलं आहे की, "वर आणि वधू दोघांच्याही कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. मोठ्या थाटामाटात लग्न करणं त्यांना शक्य नव्हतं. हे जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा आम्ही या जोडप्यासाठी अत्यंत साधा कार्यक्रम ठेवत विवाहसोहळा करण्याचा निर्णय घेतला.
लग्नाची नोंदणी न केल्यास भरावा लागणार दंड?
ब-याचदा विवाह झाल्यानंतर त्याची नोंदणी करण्यासाठी आपण टाळाटाळ करतो. खरं तर नियमानुसार 30 दिवसांच्या आत लग्नाची नोंदणी करणं आवश्यक असतं. या नियमांचं पालन काटेकोरपणे केलं जात नाही. मात्र आता तुम्हाला विवाह नोंदणी करण्याशिवाय गत्यंतर नाही. लग्न झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत विवाह नोंदणी करणे लवकरच बंधनकारक करण्यात येणार असून, या नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. तसेच विवाह नोंदणी करण्यास टाळाटाळ करणा-यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे.