"...तेव्हा आपोआप हिंदू-मुस्लीम ऐक्य होईल!"; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी CM योगींना सांगितला फॉर्म्यूला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 10:41 AM2024-10-30T10:41:15+5:302024-10-30T10:42:00+5:30
Shankaracharya Avimukteswarananda : शंकराचार्य अविमुक्तेश्वानंद म्हणाले, 'बटेंगे तो कटेंगे' ही भविष्यकाळात होणारी क्रिया है. हा भविष्यातील शक्यतेचा इशारा आहे. याचा अर्थ आहे की, अद्याप आपल्यात फूट पडलेली नाही, मात्र याची शक्यता आहे. आपल्यात कशामुळे फूट पडेल, याचे कारण आपल्याला शोधावे लागेल.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे 'बटेंगे तो कटेंगे' विधान सातत्याने चर्चेत आहे. यातच आता शंकराचार्य अविमुक्तेश्वानंद सरस्वती यांनीही त्यांच्या विधानासंदर्भात भाष्य केले आहे. देशात ऐक्य आवश्यक असल्याचे म्हणत, यासाठी त्यांनी सरकारला एक फॉर्म्यूला देखील सांगितला आहे.
शंकराचार्य अविमुक्तेश्वानंद म्हणाले, 'बटेंगे तो कटेंगे' ही भविष्यकाळात होणारी क्रिया है. हा भविष्यातील शक्यतेचा इशारा आहे. याचा अर्थ आहे की, अद्याप आपल्यात फूट पडलेली नाही, मात्र याची शक्यता आहे. आपल्यात कशामुळे फूट पडेल, याचे कारण आपल्याला शोधावे लागेल.
सीएम योगी आणि भाजपला शंकराचार्यांचा प्रश्न -
स्वामी अविमुक्तेश्वानंद सरस्वती यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजप आणि आरएसएसला प्रश्न विचारताना म्हटले आहे की, आपल्याल जर ऐक्य आणायचे असेल तर फॉर्म्युला काय? ते म्हणाले, ''गायीला राष्ट्रमाता घोषित करा, गोहत्येला गुन्हा म्हणून घोषित करा. गाय माता आहे, हे जेव्हा संपूर्ण देशाला समजेल, तेव्हा संपूर्ण देश गाय आपली माता आहे, असे म्हणेल."
अविमुक्तेश्वानंद सरस्वती पुढे म्हणाले, जेव्हा दोघांचीही माता (गाय) एक होईल, तेव्हा दोघेही आपोआप भाऊ होतील. भावा-भावात ऐक्य होईल. यालाच बंधुत्व म्हणतात. हे गायीला राष्ट्रमाता घोषित करूनच होऊ शकते. एवढेच नाही, तर जनते समोर फुटीची कारणं ठेवावी लागतील, अशेही ते म्हणाले.
काय म्हणाले होते योगी? -
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका सभेला संबोधित करताना म्हणाले होते, "जेव्हा आपण संघटित राहू, आपल्यात नैतिकता असेल, तेव्हा राष्ट्र सशक्त होईल, फूट पडली तर कापले जाऊ (बटेंगे तो कटेंगे). बांगला देशात बघत आहात, ती चूक येथे व्हायला नको. एक राहू तर सुरक्षित राहू." योगींच्या या विधानानंतर राजकारण पेटले आहे.