...तर, राष्ट्रपती भवन, संसद भवनही नष्ट करा , ताजमहालचा वाद, सपाचे महासचिव आझम खान संतापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 01:27 AM2017-10-18T01:27:03+5:302017-10-18T01:28:22+5:30
राष्ट्रपती भवन, संसद भवन आणि लाल किल्ला यांसारखी स्मारकेही नष्ट करायला हवीत. तीसुद्धा ताजमहालप्रमाणे ‘गुलामगिरीची प्रतीके’ आहेत, अशा शब्दांत समाजवादी पार्टीचे महासचिव आजम खान यांनी संताप व्यक्त केला.
रामपूर : राष्ट्रपती भवन, संसद भवन आणि लाल किल्ला यांसारखी स्मारकेही नष्ट करायला हवीत. तीसुद्धा ताजमहालप्रमाणे ‘गुलामगिरीची प्रतीके’ आहेत, अशा शब्दांत समाजवादी पार्टीचे महासचिव आजम खान यांनी संताप व्यक्त केला. भाजपाचे आमदार संगीत सोम यांनी सोमवारी ताजमहालच्या इतिहासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर, आझम खान यांनी हा टोला लगावला आहे.
इतिहासातून मुगल शासकांना हटविण्यासाठी इतिहासाचे पुनर्लेखन केले जाईल, असे सोम यांनी म्हटले होते. हाच धागा पकडून आझम खान म्हणाले की, मला असे वाटते की, गुलामगिरीची सर्व प्रतीके नष्ट करायला हवीत. फक्त ताजमहलच का? संसद, राष्ट्रपती भवन, कुतुबमीनार आणि लाल किल्ला यांना हटवायला पाहिजे. ही सर्व गुलामगिरीची प्रतीके आहेत. आझम खान म्हणाले की, जर भाजपा आणि सोम हे ताजमहलला भारताचा वारसा म्हणून स्वीकारत नसतील, तर भाजपा आमदारांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह स्मारक उद्ध्वस्त करण्यासाठी पुढे यायला हवे.
भारतमातेच्या सुपुत्रांच्या रक्त, घामातून उभारला आहे ताजमहाल
ताजमहाल कोणी आणि का उभारला, याला महत्त्व नाही, तर भारतमातेच्या सुपुत्रांनी आपल्या रक्त आणि घामातून हा ताजमहाल उभारला आहे, हे महत्त्वाचे आहे, असे मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे २६ आॅक्टोबर रोजी ताज नगरीत जाणार आहेत. पर्यटनाच्या योजनांची ते समीक्षा करणार आहेत. ते म्हणाले की, आग्रा येथे जाणाºया पर्यटकांना सुरक्षा आणि सुविधा देणे उत्तर प्रदेश सरकारचे कर्तव्य आहे. आम्ही आग्रा शहरासाठी ३७० कोटी रुपयांची योजना तयार केली आहे.