... तर मुलींना बुरख्यात ठेवावे लागेल - गिरिराजसिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2016 03:06 AM2016-04-22T03:06:28+5:302016-04-22T03:06:28+5:30

सर्व धर्मांना दोन मुलांचे बंधन न घातल्यास आणि लोकसंख्येसंबंधी धोरण न बदलल्यास आपल्या मुली सुरक्षित राहणार नाहीत

... then the girls will have to be kept under garbage - Giriraj Singh | ... तर मुलींना बुरख्यात ठेवावे लागेल - गिरिराजसिंग

... तर मुलींना बुरख्यात ठेवावे लागेल - गिरिराजसिंग

Next

पाटणा : सर्व धर्मांना दोन मुलांचे बंधन न घातल्यास आणि लोकसंख्येसंबंधी धोरण न बदलल्यास आपल्या मुली सुरक्षित राहणार नाहीत. त्यांना पािकस्तानातील मुलींप्रमाणे बुरख्यात ठेवावे लागेल, असे आणखी एक बेधडक विधान केंद्रीय मंत्री गिरिराजसिंग यांनी बुधवारी केले. दरम्यान, त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून नवा वाद निर्माण झाला आहे.
हिंदूंना दोन मुले असतील तर मुस्लिमांनाही तेवढीच मुले हवी. हिंदूंची संख्या कमी होत आहे. बिहारच्या सात जिल्ह्णांमध्ये मुस्लिमांपेक्षा हिंदूंची संख्या कमी आहे. लोकसंख्येचा नियम बदलला तरच आपल्या मुली सुरक्षित राहतील अन्यथा त्यांना बुरख्यामध्येच ठेवावे लागेल, असे ते प. चंपारण जिल्ह्णातील बागा येथे एका कार्यक्रमात म्हणाले. लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)

Web Title: ... then the girls will have to be kept under garbage - Giriraj Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.