...तर पाकिस्तानात जाऊन योगा शिकवेन- रामदेव बाबा

By Admin | Published: June 18, 2017 05:47 PM2017-06-18T17:47:17+5:302017-06-18T17:47:17+5:30

21 जून रोजी येणारा आंतरराष्ट्रीय योग दिवस पाकिस्तानात जाऊन साजरा करण्याची मनीषा योग गुरू रामदेव बाबा यांनी व्यक्त केली

... then go to Pakistan and teach yoga - Ramdev Baba | ...तर पाकिस्तानात जाऊन योगा शिकवेन- रामदेव बाबा

...तर पाकिस्तानात जाऊन योगा शिकवेन- रामदेव बाबा

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 18 -  21 जून रोजी येणारा आंतरराष्ट्रीय योग दिवस पाकिस्तानात जाऊन साजरा करण्याची मनीषा योग गुरू रामदेव बाबा यांनी व्यक्त केली आहे. रामदेव बाबा यांना पाकिस्तानातील योग कार्यक्रम राबवायचा आहे, त्यासाठी त्यांनी पाकिस्तानात जाण्याची तयारीही दर्शवली आहे.

पाकिस्तानकडून मला योगा शिकवण्यासाठी निमंत्रण आलं आहे. पाकिस्तानमधला प्रत्येक व्यक्ती हा दहशतवादी नाही. शेजारील देशांनाही योगा शिकवण्याची गरज आहे. मात्र मला पाकिस्तानातल्या राजकीय अस्थिरतेची चिंता आहे. तरीही मी पाकिस्तानात जाणार आहे, असंही रामदेव बाबांनी सांगितलं आहे. चार दिवसांच्या योग शिबिराला आजपासून सुरुवात झाली आहे. त्यानिमित्तानं ते गुजरातमध्ये बोलत होते.

पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन करण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यासाठी भारत सरकारनं जोरदार प्रयत्न करण्याची गरज आहे. तसेच 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड दाऊद इब्राहिम, जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर आणि जमाद-उद-दावाचा प्रमुख हाफीद सईदला संपवण्यासाठी केंद्र सरकारनं योग्य पावलं उचलली पाहिजेत. पाकिस्तानमधील सामान्य लोक हे वाईट नाहीत, फक्त त्यातील काही जण दहशतवाद पसरवतात. पाकिस्तानमधील लोक चांगले असल्यानेच तिथे जाऊन योगा शिकवायला आवडेल, असेही रामदेव बाबा म्हणाले आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाचंही रामदेव बाबांनी पुन्हा समर्थन केलं आहे. नोटाबंदीचं फलित म्हणून स्विस बँक काळा पैसे धारकांची माहिती देण्यासाठी तयार झाली आहे. भारताच्या सीमाभागात अजूनही बनावट नोटा सापडत असल्यानं दहशतवादाचा धोका कायम आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकार सतर्क असून, दहशतवादाला आळा घालण्यासाठी प्रयत्नशील आहे, असंही रामदेव बाबा म्हणाले आहेत. 

 

Web Title: ... then go to Pakistan and teach yoga - Ramdev Baba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.