'... तर मी योगी आदित्यनाथांच्या छाताडावर बसून 32 हाडं मोडली असती'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 05:13 PM2020-01-13T17:13:05+5:302020-01-13T17:13:35+5:30
नागरिकता दुरूस्ती कायद्याविरुद्ध समस्तीपूर येथे संविधान बचाव संषर्घ समितीद्वारे
पाटणा - बिहारमधील जन अधिकार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी खासदार राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशातील सामाजिक वातावरण कलुषित झाले असून जिल्हाधिकारी अन् प्रशासनाकडून आंदोलनकर्त्यांना धमक्या देण्यात येत आहेत. यावरुन पप्पू यादव यांनी कडक शब्दात योगींवर प्रहार केला.
बिहारचे रहिवाशी असलेल्या पप्पू यादव यांनी योगींवर प्रहार केला. मी अन् योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे रहिवाशी असतो, तर योगींच्या छातीवर बसून त्यांची 32 हाडं तोडली असती, असे पप्पू यादव यांनी म्हटले. समस्तीपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. देशात जेव्हा अत्याचार वाढीस लागतो, तेव्हा कापसाप्रमाणे तो उडूनही जातो, असे म्हणत यादव यांनी योगी आदित्यनाथ यांना वेड्याचीही उपमा त्यांनी दिली.
नागरिकता दुरूस्ती कायद्याविरुद्ध समस्तीपूर येथे संविधान बचाव संषर्घ समितीद्वारे आंदोलनास पप्पू यादव यांनी समर्थन दिले. त्यानंतर, तेथे उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना, त्यांनी योगींना लक्ष्य केले. तसेच, जिल्हाधिकारी अन् प्रशासनाकडून आंदोलनकर्त्यांना धमक्या देण्यात असून जेएनयु अन् जामिया यांसारख्या मंदिरावर हल्ला करण्यात येत आहे. तर, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ट्विट करणारे जेएनयु हल्ल्यावर का ट्विट करत नाहीत, असा प्रश्न विचारत लालुपुत्र तेजस्वी यादव यांनाही यादव यांनी टार्गेट केले.